मदना येथे जागतिक पर्यावरण दिननिमित्त वृक्ष लागवड

0

By साहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदनी(आमगाव)
नजीकच्या मदना या गावी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली असून दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो . पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागृकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत , रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिपरी मेघे येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यानी जागतिक पर्यावरण दिननिमित्त वृक्ष लागवड मोहिम राबवीलीआली, असून येथील सरपंच जयश्री मदनकर , ग्रामसेवक प्रवीण आत्राम , ग्रामपंचायत सदस्य संजय गेडाम यांचा हस्ते वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के , कार्यक्रम अधिकारी पी. एस . खोडके , कार्यक्रम समन्वयक डॉ. राणी काळे, वैभव गिरी यांचे मार्गदर्शन लाभले . वृक्ष लागवडी साठी वैभव वानखेडे, निवास बुधवत , सम्यक गोटे , सिद्धेश उंबरकर, पंकज तडस, यशवंत शिंदे , संकेत झोड या कृषी विद्यार्थ्यानी मेहनत घेतली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!