ब्राह्मणवाडा गावात वाघाने एकाच रात्री कालवड व बकरीचा पाडला फडशा

0


मदनी आमगाव/ गजेंद्र डोंगरे :

परिसरातील ब्राह्मणवाडा हे गाव जंगल व्याप्त असून दि. ४ ला मध्यरात्रीच्या सुमारास वाघ गावात शिरून देवनाथ सिराम यांचे घरा लागत लागून असलेल्या गोठ्यात गुरे ढोरे यांचा गोठा आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वाघ गावात शिरून वाघाने गोठ्यातच कालवडीची शिकार करून फस्त केल्याची घटना सकाळी उघडकीस आली असून या भागात हिंस्त्र प्राण्यांचा नेहमी वावर असतो. अशी माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. तसेच ब्राह्मणवाडा लगत असलेल्या इंदिरा झोपडपट्टी येथे श्री. मंगल उईके यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात वाघ शिरून बकरीची शिकार केल्याची घटना त्याच रात्री घडली आहे. मात्र ,परिसरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
या परिसरात वन्य प्राणी नेहमी रात्रीच्या सुमारास गावात शिरण्याचा प्रयत्न करतात बरेचदा शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना हिंस्र प्राण्यांचे दर्शनही होत असते. मात्र, रात्रीला खांबे वरील विजे अभावी गावात काळोख पसरलेला असतो याचा फायदा हिंस्र जनावरांना होत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितल्या जाते. नागरिकांनी गावातील विजेच्या खांबावर लाइटची व्यवस्था करावी याकरिता बरेचदा ग्रामपंचायतींना नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. रात्रीच्या काळोखाचा फायदा हिंस्त्र प्राणी घेऊन निर्भयपणे गावात शिरून जनावरांची शिकार करीत असून ग्रामपंचायतीने गांभीर्य लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी खांबावर विजेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच वन विभागाने योग्य उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.मात्र, या घटनेचा पंचनामा सहाय्यक क्षेत्र अधिकारी श्री. देहनकर यांनी केला असून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!