मनसे नेते घंगारे यांनी लावला गळफास.

0

हिंगणघाट :२३ नोव्हेंबर येथील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कवडु घंगारे हे स्वतःच्या घरी छताचे हुकाला गळफास घेतल्या अवस्थेत मृत आढळले.त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही.प्राप्त माहीतीनुसार त्यांचा वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय होता.त्यांचा वाहनचालक त्यांना मोबाईल वरून संपर्क साधत होता परंतु त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता.त्यामुळे त्यांच्या घरच्यांना याची माहिती दिली.त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केला असता त्यांचा मृतदेह घरच्या शेवटच्या खोलीत छताचे हुकाला गळफास घेतल्या अवस्थेत मृत आढळला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हारुग्णालयात पोहचविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असुन पीएसआय वसंत चौहान, शिपाई प्रवीण शिंदे, सुनील मेंढे प्राथमिक तपास करीत असून तपासणी अंती या मृत्यूचा उलगडा होणार आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!