पुलगाव -/जैस्वाल सेरेमनी हाॅल पुलगाव येथे मराठी पत्रकर दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक लेफ्टनंट कर्नल, ए,टी,कमांन्डट, सि ए डी कैम्प पुलगाव चे, वसंत कावरे सर यांनी मराठी पत्रकारीतेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पन केले, त्यानंतर सर्वांनी अभीवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या क्रुष्णाजी समरीत यांच्या वीर पत्नी श्रीमती सविताजी समरीत तसेच सुभेदार, मेजर ओनोनरी लेफ्टनंट, सुनिल जैस्वाल,सर अनील गावंडे सर सि ए डी पुलगाव, जी. आर.पी हवालदार दुर्गा पचोरीया, पत्रकार नितीन आष्टीकर, यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अन्य पत्रकारांचा सुध्दा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष ऍड दिलिप ठाकरे कारगिल योध्दा सुनील जैस्वाल, पुलगाव टाइम्स चे मुख्य संपादक, अनुपकुमार भार्गव विदर्भ चंडिका चे जेष्ठ पत्रकार नजीर खान, सि ए डी कैम्प चे सचीन गंदेवार, रोशन रामटेके, तर पत्रकार जय देशमुख इंडिया न्यूज २४ चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी, संपादक विदर्भ पत्रिका राजू डोंगरे,दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रमोद येडाखे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी सुरेंद्र डाफ, रफिक भाई शेख, विक्रम उईके, पत्रकार संजय महाजन, जी.आर. पी. च्या महीला हवालदार दुर्गा पचोरीया, यांच्या नेतृत्वात पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले दिलीप ठाकरे सर( महाराष्ट्र प्रेस क्लबचे अध्यक्ष) यांनी पत्रकारिता का महत्त्वाची आहे व त्याने काय होऊ शकते या शब्दावर आपले परखड विचार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले लेफ्टनंट कर्नल वसंत कावरे सर, यांनी आपल्या भाषणात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्या मध्ये आजची पत्रकारिता समाजहितासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर पत्रकारांनी कुणालाही न घाबरता निस्वार्थ पणे लिखाण करून सर्व सामान्याच्या समस्या शासना पर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, कारण, खरा पत्रकार हा समाजाचा आरसा असतो..! त्यामुळे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधला जाते. तसेच शेकडो लोकांनी आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी देवळी आणि आर्वी तालुक्यातील सर्व ग्रामिण ,शहरी भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरोगामी टिव्ही न्यूज मुख्य संपादक विनय इंगळे यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी उमप कोचिंग क्लासेस संचालक श्री वैभव उमप सर यांनी सांभाळली उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकाराविषयी मार्गदर्शन केले. उर्दू हायस्कूल च्या बुषरा मॅडम यांनी सुद्धा पत्रकारांच्या निर्भीड भुमिके संदर्भात आपले मत व्यक्त केले. व शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा शेवट झाला तर आभार प्रदर्शन देशोन्नती चे पत्रकार प्रमोद एडाखे सर यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर सर्व पत्रकार बांधव तसेच पाहुण्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला. पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांकडून देशाचे रक्षण करणारे जवान यांना सन्मानित करण्याचा हा पहीलाच गौरवपूर्ण व नाविन्यपूर्ण कार्यक्रम पुलगाव शहरात संपन्न झाल्याने सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा जनमानसात तसेच संपूर्ण परीसरात होत आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र प्रेस क्लबचे देवळी तालुका, अध्यक्ष हरीश राऊत यांनी केलं होते.