महिला कामगारांच्या कुटुंबांची मरण अवस्था करणाऱ्या सरकारचा रिपाइं (ए) तर्फे जाहिर निषेध ! :
:आज महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोंबर ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) विदर्भ प्रदेश तर्फे वर्धा जिह्यातील रिपाइं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाइन्स वर्धा येथील महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन महिला कामगारांच्या साखळी उपोषण आंदोलनाला, भारतीय संविधान जिंदाबाद,भारतीय लोकशाही जिंदाबाद च्या घोषणा देत भेट दिली.त्यावेळी केंद्रातील मोदी व महाराष्ट्रातील शिंदे-फडणविस सरकारचा जाहीर निषेध केला आहे.येथिल महिला कामगारांच्या मुलभूत मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गांधी जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी वर्धा जिल्हा रिपाइं (ए) नी दिला आहे.केंद्र व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे वर्धा जिल्हा तथा विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी,मोदी सरकार हे शेतकरी,शेतमजूर,कामगारांचे शोषण करणारे असून शोषित पिडीत वंचित बहुजनांच्या विरोधातील सरकार आहे.त्यामुळे शासन स्तरीय सेवेतील कामगार महिलांना येथील राज्यकर्त्या भाजपा सरकारने मोदी यांच्या हिटलरशाही निर्देशानुसार कामावरून बंद केले आहे.हजारो कामगार महिलांचे कुटुंब अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहे.या कुटुंबांची अवस्था मरण अवस्था झालेली आहे.आता मोदी युगात नवीन शब्दप्रयोग आला ‘स्वच्छांजली’,कदाचित ‘मोदी युगाचा शेवट ‘शौचांजली’ ठरला तर नवल वाटू नये.असे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.कामगारांच्या साखळी उपोषणाला रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेश संघटक मंगेश चोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आंदोलनात सहभागी राष्ट्रीय मजदुर संघटनेच्या महिला कामगार व कामगार नेते सुरेश रंगारी तसेच रिपाइं (आंबेडकर) कार्यकर्त्यांनी मंगेश चोरे यांचा वाढदिवस साजरा केला.लबाडपणाचे राजकारण भाजपा सरकारने करु नये.शासन स्तरीय सेवेत महिला कामगारांना त्वरित सामावून घ्यावे येथिल कामगारांची फसवणूक करु नये.असे निर्भिडपणे मनोगत मंगेश चोरे यांनी साखळी उपोषण मंडप स्थळी व्यक्त केले.जिल्हा संघटक समाधान पाटील,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष सतीश इंगळे,युवा आघाडी जिल्हा सचिव अंकित रामटेके,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र थूल,बंडू फुलमाळी,वर्धा विधानसभा अध्यक्ष रुपेश नागदिवे,जिल्हा महासचिव सुधीर सहारे,जिल्हा सचिव सुभाष कांबळे,वर्धा तालुका अध्यक्ष सुनील वनकर,राजू भगत,वर्धा तालुका सचिव सुरेश आगलावे,राहुल वाघमारे,संजय देशमुख,गोवर्धन नगराळे,जयकांत पाटील, अरविंद भगत,प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष,राजू थूल,सुनील हंबर्डे,किशोर फुसाटे, प्रवीण पोळके,धीरज मेश्राम,रंजन कांबळे,पुरुषोत्तम भगत,आदी रिपाइं (आंबेडकर) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व महाराष्ट्र राज्यातील असंविधानिक सरकारचा जाहीर निषेध नोंदविला आहे.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24