माकपाच्या वर्धा तालुका सचिवपदी दुर्गा काकडे तर शहर सचिव म्हणून विनोद तडस यांची उत्साहात निवड …

0

🔥माकपाच्या वर्धा तालुका सचिवपदी दुर्गा काकडे यांची उत्साहात निवड.

वर्धा -/ तालुका व वर्धा शहराचे संयुक्त त्रिवार्षीक अधिवेशन शुक्रवार ३ जानेवारी २५ रोजी. स्थानिक अहिल्याबाई होळकर सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाकरीता १५० हुन अधिक लोक हजर होते.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी. एन. हिवरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भैय्या देशकर, कामगार नेते यशवंत झाडे, रामभाऊ टावरी,समिर बोरकर यांची उपस्थीती होती.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दुर्गा काकडे,कांचन हिंगे यांनी पुष्पहार अर्पन केला तर रेखा झाडे यांनी अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन केले.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना यशवंत झाडे म्हणाले की रामचंद्र घंगारे यांचे पश्चात आपण पक्षाचे कार्य कमी अधिक प्रमाणात कार्यरत ठेवले आहे.एकेकाळी पक्षाचा वर्धा विधान सभेत आमदार तर वर्धा लोकसभेत खासदारही होते. अनेक नगरसेवक वर्धा,आर्वी, देवळी येथे राहीले.जिल्हा परिषद सदस्यही सरपंचही झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट हा गरीब कष्टकऱ्यांचा पक्ष आहे.ह्या पक्षाचा विस्तार होणे गरजेचे आहे.आज राजकारणांत कार्याची गुणवत्ता पाहीली जात नाही तर निवडुण येण्याची क्षमता तपासली जाते.यामुळे सामान्य गरीब मानुस व लोक प्रतिनिधी यांची नाळ तुटली आहे.कष्टकरी, गरीब, दलीत आदिवासी, बहुजन समाज या गरीब घटकाला संघटीत करुन पक्षाचे विचाराकडे आणने गरजेचे आहे.त्याकरीता प्रयत्नरत राहावे असे आवाहन यशवंत झाडे यांनी केले.
प्रास्ताविक रामभाऊ ठावरी यांनी केले. याप्रसंगी दुर्गा काकडे, कांचन हिंगे, सुनिल घिमे, कांताबाई प्रधान यांनी विचार व्यक्त केले.भैय्या देशकर, डी.एन.हिवरे यांनी समयोचीत मार्गदर्शन उपस्थीतांना केले. वर्धा तालुका अध्यक्ष म्हणुन एकमताने दुर्गा काकडे ह्यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणुन देवेंद्र शिनगारे, राजु तिजारे,हिवरेजी,मधुकर पांडे, शरद ढोणे, प्रभाकर हावरे, संतोष नाखले, कांचन हिंगे, कांताबाई प्रधान, रामभाऊ ठावरी,घुगरे,शिलानंद बुरबुरे, जगन चांभारे,प्रभाकर धवणे यांची निवड झाली.तर वर्धा शहर माकपाचे सचिव म्हणुन विनोद तडस यांची निवड झाली. सदस्यपदी धनजंय बावनकर, अनंद झाडे, संजय भगत, भुमिकांत मोहर्ले, मदन धमाने, प्रितम हिराणी, नाखले, गणेश भुतडा, सुरेश अनकर, चुडामन घवघवे, कल्पना चौधरी, रेखा झाडे, वामन कहाते, विवेक कांबळे,समिर बोरकर,विनोद अवथळे, इम्रतसिंग भादा, निमंत्रीत कविता गोहने, यांची निवड झाली.
मावळते तालूका सचिव रामभाऊ टावरी व शहर सचिव समिर बोरकर यांचा निरोप समारंभ होवुन पुष्पगुच्छ देऊन नविन नियुक्त सचिवांनी सन्मान केला. आभार प्रदर्शन व क्रांतीकारी गित गायन संजय भगत, कांचन हिंगे यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS -/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!