माळेगाव ठेका येथील रहिवासी चार दिवसापासून काळोखात* *विधुत महावितरण चे अधिकारी सुस्त,माळेगाव ठेका गावातील नागरिक त्रस्त*
*माळेगाव ठेका येथील रहिवासी चार दिवसापासून काळोखात*
*विधुत महावितरण चे अधिकारी सुस्त,माळेगाव ठेका गावातील नागरिक त्रस्त*
प्रतिनिधी/गजेंद्र डोंगरे सेलू
माळेगाव ठेका या गावात तसेच आजूबाजूच्या गावातील वीजपुरवठा खंडित झाला असल्यामुळे नागरिकांना नहाक त्रास सहन करावा लागत असून महावितरण कार्यालय खरांगणा येथील अधिकारी अभियंता देशपांडे यांना वारंवार उपसरपंच प्रमोद मेटकर तसेच विनोद सुरजूसे व नागरिकांकडून फोन करूनही योग्य उत्तर मिळत नसून वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असे उत्तर अधिकारी देतात मात्र चार दिवसापासून या परिसरातील नागरिक यातनादायक जीवन जगत आहे. मात्र अधिकारी निद्रेत असून गांभीर्य लक्षात घेत नसल्याची चर्चा गावात होत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार ‘महावितरण’च्या कार्यालयात वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी हेलपाटे मारले. मात्र, वाहिनीच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. अखेर चार दिवस होऊनही वीज पुरवठा सुरू होऊ शकत नाही. ही बाब गंभीर असल्याचे दिसून येते. वीज पुरवठा पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून वीज नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामांचा खोळंबा होत आहे. विशेषत: घरातील पाणी पुरवठ्यावर वीजेचा परिणाम होत आहे.पीठ गिरणी बंद आहे.रात्री गावात काळोख पसरलेला असतो. मोबाईल बंद झाले आहेत. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती नाकारता येत नाही.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाला सुरुवात झाली की वीज खंडित होते,असा अनुभवही वारंवार येत असतो. याबाबत ‘महावितरण’च्या कार्यालयाशी संपर्क केला असता ‘झाड पडले आहे’, ‘वीजवाहिनी तुटली आहे’, ‘किती वेळ लागेल सांगता येणार नाही’, ‘काम सुरू आहे’ अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लगतो. वीज नसल्यामुळे इमारतीतील पाणी टाकीपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पिण्याचे पाणी व लहान-मोठे व्यवसाय बंद पडल्याने रहिवासी वैतागले आहेत.