मा खासदार प्रतिभा ताई धानोरकर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र यांची आयुध निर्मानी चांदा प्रशासना सोबत कामगाराच्या विविध प्रश्नावर चर्चा.

0

🔥खा.प्रतिभा ताई धानोरकर चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र यांची आयुध निर्मानी चांदा प्रशासना सोबत कामगाराच्या विविध प्रश्नावर चर्चा.

भद्रावती -/ चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा प्रतिभाताई धानोरकर यांची आयुध निर्मानी चांदा प्रशासना सोबत कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने स्थानिक आयुध निर्मानी चांदा येथे अप्रेनटीस करणार विध्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य देणे,अनुकंपा धारकांचे प्रश्न तसेच स्थानिक कंत्राटदरांना आयुध निर्मानित निघणाऱ्या कामात प्राध्यान्य देणे, रामटेके सोसायटी येथील नागरिकांना सोसायटीतुन बाहेर निघण्यासाठी गेट बसविणे, सि एस आर फंड भद्रावती शहरात व तालुक्यात खर्च करणे.या बाबत सकारात्मक चर्चा घडून आली. प्रशासन सर्व विषयावर सकारात्मक असून वरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याचे मा जनरल मॅनेजर श्री पांडे साहेब यांनी सांगितले.परंतु काही प्रश्न हे केंद्रशासनाशी निगडित असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल व खासदार म्याडमने सुद्धा शासन स्तरावर समस्या मांडून सोडविण्यासाठी आपण प्रयन्त करणार असल्याचे व प्रशासनास मदत करणार असल्याचे सांगितले.बैठकीत जनरल मॅनेजर श्री पांडे साहेब, आयुध निर्णनीचे वरिष्ठ अधिकारी, काँग्रेस चे नेते प्रवीण काकडे,काँग्रेस चे शहर अध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक सुनील नामोजवार, नगरसेविका सौ सीमाताई पवार, नगरसेविका सौ पल्लवी तामगडे, माजी नगरसेवक सुनील खोब्रागडे, युवा नेता सुयोग धानोरकर उपस्थित होते. मिटिंग चे अगोदर कामगार युनियन चे पदाधिकारी यांनी मा खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचे स्वागत केले व कामगारांच्या प्रश्ना बाबत निवेदन दिले व कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली.

          सुनील नामोझरे साहसिक News-/24 भद्रावती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!