मुक्ताईनगर तालुक्यात कृषी पंपा धारकासाठी तक्रार निवारण मेळावा व जनजागृती शिबिराच्या आयोजन

0

मुक्ताईनगर / पंकज तायडे:

कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी पंप धारकांनी योजनेत लाभ घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याकरिता व प्राप्त वीज बिलाच्या तक्रारींच्या निवारण करीता मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता व मुक्ताईनगर उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांच्या उपस्थितीत दिनांक. ११मार्च २०२२ रोजी अंतुर्ली कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आले .तसेच दिनांक १२मार्च २०२२ रोजी कोथळी व चांगदेव , कुऱ्हा काकोडा येथे कृषी धोरण २०२० योजनेबद्दल जागृती व माहिती करिता शिबीर ठेवण्यात आले. व आज दिनांक. १४ मार्च २०२२ रोजी हरताळा येथे शिबरी चे आयोजन करण्यात आले या व्यतिरिक्त मुक्ताईनगर विभागा अंतर्गत बोदवड उपविभागीय कार्यालय अंतर्गत मा. उपकार्यकारी अभियंता सचिन मुंडे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत दिनांक. ११.मार्च २०२२ रोजी वाकी येथे कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत तक्रार निवारण व माहिती शिबीर आयोजित करण्यात आले.व दिनांक. १४ मार्च २०२२ रोजी निमखेड बोदवड येथे शिबिरचे आयोजन करण्यात आले. तसेच वरणगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत मा. उपकार्यकारी अभियंता श्री. गाजरे व सहाय्यक लेखापाल सौ. दिपाली सोनार याच्या उपस्थितीत वरणगाव उपविभागाअंतर्गत तळवेल कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आले व असंख्य शेतकरी बांधवांनी सहभाग घेऊन वीजबिल कोरे करून योजनेचा फायदा घेण्याचे आश्वासन दिले. व वीजबिल दुरुस्तीची बाबात पुढील कारवाई करण्यात आली.शिबीर दरम्यान अंतुर्ली कक्ष येथील सम्माननिय ग्राहक नूर मोहम्मद शेख कदर रा. अंतुर्ली यांनी योजनेमध्ये भाग घेऊन १ लक्ष २७ हजारचा भरणा केला. तसेच तळवेल येथील सम्माननीय ग्राहक वामन मीठाराम झोपे यांनी १ लक्ष ५६ हजार व ज्ञानदेव तुकाराम पाटील यांनी १ लक्ष १८ हजाराचा भरणा केला. सर्व्ह अधिकारी, कर्मचारी, ग्राहकाचे अभिनंदन केले.
सदरील विविध शिबिरांमध्ये कक्ष अभियंता कक्ष अभियंता सचिन आठवले ,सहाय्यक अभियंता अमोल राणे , सहाय्यक अभियंता. सहाय्यक अभियंता नितीन महाजन सहाय्यक अभियंता प्रदीप खैरे तसेच सर्व कक्षातील जनमित्र वर्गाने परिश्रम घेतले.तसेच कार्यकारी अभियंता यांनी कळवले कि, मार्च २०२२ मध्ये विविध कक्षा अंतर्गत शिबिरे घेण्याचे ठरविले आहे. तरी ग्राहकांना विनंती कि जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!