मुक्ताईनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

 

Byसाहसिक न्युज 24

मुक्ताईनगर / पंकज तायडे: मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला असून २२ जुलैला नविन नगराध्यक्षाची निवड होणार आहे.

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ८ नोव्हेंबरला अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला होता. तेव्हा पासून नगराध्यक्ष पद रिक्त होते.निवणूक कार्यक्रम खालील प्रमाणे नगराध्यक्ष निवडणूकीसाठी १८/७/२०२२ दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असून अर्जाची छाननी त्याच दिवशी होणार आहे.

उमेदवारांना अपिलात जायचे असल्याचे १९/७/२०२२ सांयकाळी ५ वाजेपर्यंत अपील दाखल करू शकणार आहे.

वैध नामनिर्देशन पत्राची यादी २०/७/२०२२ ला प्रसिद्ध करण्यात येणार

२१/७/२०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

२२/७/२०२२ सकाळी १२ वाजेपासून नगराध्यक्ष निवडणूक प्रकियेस सुरवात होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!