मुक्ताईनगर शहरांमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

0

Byसाहसिक न्युज 24

मुक्ताईनगर/ पंकज तायडे :

  मुक्ताईनगर शहरामध्ये तापी पूर्णा चा संगम असून पूर्णा नदीचा मोठा जलसाठा  असून सुद्धा शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे दरवर्षाप्रमाणे पूर्णा नदीला यंदाही पहिल्या पावसात नदीला पूर आला असून पूर आल्याच्या कारणाने नदीचे पाणी गढूळ झाले असून नागरिकांना नगरपंचायत मार्फत पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे 8 दिवस होऊन सुद्धा नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नसून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे पाणी गढूळ झाल्यामुळे नगरपंचायत च्या असलेल्या  नदीवरच्या मोटरी दरवर्षाप्रमाणे जळत असल्याकारणाने नगरपंचायत नागरिकांना पाणीपुरवठा करण्या स असमर्थ ठरत आहे दरवर्षाप्रमाणे अडचणी येत  असताना देखील नगरपंचायत यावर उपाययोजना करताना दिसून येत नसून यावर नगरपंचायतने योग्य  निर्णय घेऊन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्यापासून थांबवावे अशी चर्चा महिला मंडळ यांच्यामध्ये जोर धरत आहे

नगरपंचायत ला दर वर्षाप्रमाणे नळपट्टीचा कर देऊन सुद्धा नगरपंचायत पाणी पुरवण्यास असमर्थ का ठरत आहे असा प्रश्न महिला मंडळ मार्फत करण्यात येत आहे पाण्याचे टँकर आणून नागरिकांना स्वतःच्या खिशाला झळ देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे असा खर्च नोकरवर्ग झेपऊ शकेल परंतु साधारण कुटुंबाचे काय यांना पाण्याचे टँकर कोण देणार असा प्रश्न मध्यमवर्गीय नागरिकांना पडला आहे दरवर्षी जर असा पाणीपुरवठा खंडित होत असेल तर यावर नगरपंचायतने उपाय योजना करायला हव्या पाण्याच्या मोटरींना दीर्घकाळ होऊन सुद्धा मोटरी का बदलल्या जात नाही याची सुद्धा चर्चा होत आहे दरवर्षी मेंटेनन्स करून तेवढ्याच रुपयांमध्ये नवीन मोटर येत असून मोटर का बदलली जात नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!