मुक्ताई मंदिराजवळ हरीण मृतावस्थेत आढळले
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/मुक्ताईनगर:
तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिराजवळच आज पहाटे एक हरीण मृतावस्थेत आढळून आले आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यात या हरणाचे शवविच्छेदन करून नंतर त्याचा मृतदेह पुरण्यात येणार असल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी साहसिक न्यूज24 च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.आज पहाटे मंदिराजवळ हरिणाचा मृतदेह पडला असून त्याचे लचके कुत्रे तोडत असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील संजय चौधरी यांना सांगितली. त्यांनी तातडीने याबाबत वन खात्याशी संपर्क केल्यावर दीपश्री जाधव, बी. एन. पाटील व श्री. पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी पाहता वाहनाच्या अपघातात किंवा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात या हरणाचा मृत्यू झाला नसावा असे दिसून आले आहे. अर्थात, या हरणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता असली तरी शवविच्छेदनातून याबाबतची अचूक माहिती कळणार आहे.