मेव्हण्याची एक बुक्की पडली भारी, दाजीनं गाठलं थेट पोलीस स्टेशन, नेमकं प्रकरण काय?
साहसिक न्युज24
पुणे : मेव्हणा आणि दाजी हा वाद प्रत्येक घरात नवीन नाही आहे. पुण्यातल्या वारजे परिसरात मेव्हण्यासोबत आर्थिक वाद झाल्याने पत्नीने आपल्या नवरा झोपेत असताना गरम पाणी अंगावर ओतलं होत. ही घटना ताजी असताना आता पुण्यातल्या मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाजी आणि मेव्हण्याचा वाद टोकाला गेला. यानंतर मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत चार दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १६ जुलैलै म्हणजे काल १ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सयाजी साहेबराव बोरसे (४६) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी मेव्हणा जितेंद्र देवदास पाटील (४५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी साहेबराव बोरसे यांचे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मेव्हण्यासोबत कौटुंबिक वाद सुरू होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादी सयाजी बोरसे यांनी आरोपी जितेंद्र पाटील यांना फोन करून तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे, असे बोलून वाईट वाईट शिविगाळ केली.
त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील त्याच्या पत्नी आणि मुलासह फिर्यादीच्या घरी याचा जाब विचारण्यासाठी गेला. आरोपी जितेंद्र पाटील यांनी फिर्यादी सयाजी बोरसे यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी जितेंद्रच्या तोंडावर हाताने बुक्की मारली. ज्याने फिर्यादी सयाजी बोरसे यांचे चार दात तुटले. या बाबत सयाजी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे.