मोटरसायकल सह शेतीचे अवजारे चोरी करणारे चोर समुद्रपूर पोलिसांच्या जाळ्यात.

0

समुद्रपुर.१९ सप्टेंबर गुन्ह्याची हकिकत याप्रमाणे आहे कि,वरील नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी हे ए.पी.एस.एस. आदर्श बायो. ॲग्रो.प्रा.लि. लसणपुर कंपनीमध्ये सुपरव्हायझर असुन, त्यांचे कंपनीमध्ये सि.एन.जी. गॅस ची निर्मीती होत असते. कंपनीमध्ये पाण्याच्या पुरवठ्याकरीता विहीर असुन, त्या विहीरीमध्ये असलेले ५ एच.पी. व ३ एच.पी. चे दोन सबमर्सिबल मोटर पंप केबल वायरसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे रिपोर्टवरून पो.स्टे. समुद्रपूर येथे वरील नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासात डि.बी. पथक पो.स्टे. परीसरात आरोपी व मुद्देमालाचा शोध घेत असतांना, मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे, यातील नमुद आरोपीतांना त्यांचे राहते घरी जावून गुन्ह्यासंदर्भाने विचारपूस केली असता, ते उडवा-उडवीचे उत्तरे देत असून, त्यांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने, त्यांचे राहते घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, सदर गुन्ह्यातील वरील नमुद वर्णनाचा चोरीस गेलेला मुद्देमाल व चोरीच्या मालाची वाहतुक करण्याकरीता वापरलेली मोटर सायकल असा जु.किं. १,२३,३००रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने, तो जप्त करण्यात आला. आरेापीतांनी यापुर्वी चोरी केलेली मोटर पंप व स्प्रिक्लर बाबत पो.स्टे. समुद्रपूर येथे अप क्र. ३९८/२३ कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद असल्याने, दोन्ही आरोपीतांचा दि. २० सप्टेंबर पावेतो पि.सी.आर. घेण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
कारवाई सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.                                                                                          ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!