मोटार सायकल कारच्या अपघातात एक ठार तर दोन जखमी

प्रतिनिधी / वर्धा:
वर्धा तालुक्यातील सेलू काटे ते वायगाव दरम्यान कार व मोटर सायकलची जोरदार धडक होऊन यात मोटर सायकल वर असलेले तिघांपैकी एक जागीच ठार झाला तर दोन गंभीर जखमी झाले असून दोघांना रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सेलूकाटे येथील रहिवासी दिलीप रामदास कांबळे वय 55 वर्ष, नानाजी थूल व नारायण देवडे असे तिघी वायगाव शिवारात असलेल्या दिलीप कांबळे यांच्या शेतातून मोटारसायकलने घरी परत येत असताना वायगाव ते सेलूकाटे दरम्यान असलेल्या वर्धा अर्बन वेअर हाऊस जवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने मोटरसायकल वरील दिलीप रामदास कांबळे हे जागीच ठार झाले तर नानाजी थूल व नारायण देवडे यांना गंभीर दुखापत झाली असून , त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.