यशवंत महाविद्यालय भिडी च्या विद्यार्थ्यांकडून बेघर रुग्णांना आर्थिक मदत.

0

यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व शिक्षक मिळून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या बेघर मनोरुग्ण, निराधार दुर्लक्षित घटकांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा समाजातील इतर लोकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे याकरिता यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन च्या सहकार्याने दिनांक १नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयांच्या प्राचार्य उर्मिला मसराम तसेच नंददीप फाउंडेशनचे प्रा. प्रफुल्ल चौके प्रा. कावडे,  संजीवनी भोयर कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. अरविंद राठोड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रफुल्ल चोके यांनी बेघर मनोरुग्णांविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच प्राध्यापक कवडे यांनी नंददीप फाउंडेशनच्या कार्यक्रमाविषयी तसेच समाजातील दुर्लक्षित असलेले घटक आणि अशा या घटकांना समाजामध्ये सामावून घेण्याची नितांत आवश्यकता असून अशा बेघराना आपण मदतीचा हात द्यावा अशा प्रकारच्या आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मसराम यांनी सुद्धा विस्तृत माहिती दिली. प्रा. अरविंद राठोड यांनी नंददीप फाउंडेशनचे हे उपक्रम अतिशय कळकळीचे जिव्हाळ्याचे मायेचे बळ देणारे असून हा उपक्रम स्तुत्य असून नंददीप फाउंडेशनचे प्रशंशा केली. याप्रसंगी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मदतीचा हात देऊन सहयोग राशी दिली या कार्यक्रमाचे संचालन निशा कापकर  यांनी केले.

सागर झोरे सहासिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!