यशोदा नदीच्या पुलावर अपघात,दोन ठार एक जखमी.
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/देवळी:
शनिवारी रात्री 11.30 वाजता दरम्यान दुचाकी क्रमांक एम. एच.29 बी. एस.5613 या वाहनाने सावगी वरून यवतमाळ कडे जात होते. दुचाकीवर तीन व्यक्ती स्वार होते, यशोदा नदीच्या पुलावर , आंजी अंदोरी चौफुली जवळ यशोदा नदीच्या पूलाच्या कठड्याला दुचाकीने जबरदस्त धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मुत्यू झाला तर एक जण गंभीर स्वरूपात जखमी झाले. मुतकामध्ये दुर्गेश सुरेशराव डेहणकर, समीर शेंडे रा. कोंटबा ता. बाभुळगाव. जिल्हा यवतमाळ तर स्वप्निल ठाकरे रा. कोंटबा ता . बाभुळगाव -. जि यवतमाळ हा गंभीर रित्या जखमी झाला या घटनेची माहीती देवळी पोलिसाना मिळताच ठाणेदार तिरुपती राने आपल्या दलासह घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या स्वत्नील ठाकरे याला सावंगी रुग्नालया मध्ये उपचारासाठि दाखल केले तर मुतका चा पंचनामा करून त्याना शवविच्छेदनाकरिता वर्धा शासकीय रुग्नालयात पाठवले.
प्राप्त माहीतीनुसार दुर्गेश डेहनकर, समीर शेडे , स्वप्नील ठाकरे सर्व राहणार कोंटबा जिल्हा यवतमाळ हे आपल्या दुचाकीने सावगी मेघे येथे गणपती दर्शनासाठी गेले होते .श्री गणेशाचे दर्शन घेवून हे तिघेजण परतआपल्या दुचाकी वाहनाने आपल्या गावाकडे निघाले परतू यशोदा नदीच्या पुलावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्यांच्यावर काळाने झडप घातली त्यात दोन ठार एक जखमी झाला. पुढील तपास देवळीचे ठाणेदार तिरुपती राने करीत आहे.