युवकाच्या हत्येने हादरले देवळी शहर
देवळी शहरात कायदा व सुव्यवेस्था धोक्यात
शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्याशी करणार चर्चा खा-रामदास तडस
साहसिक न्युज24
देवळी / सागर झोरे :
देवळी शहरात यवतमाळ रोड वर चंद्र कौशल्य सभागृह येथे काल रात्रीच्या11वाजताच्या सुमारास दोन युवकांनी मिळून मृतक दुर्गेश राधेशाम शेंडे वय 22 वर्ष यांची छातीवरच्या, मानेवर,पोटावरचा चाकूचे घाव मारून निर्घृण हत्या केली.आणी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
दि.15.ऑक्टोंबर 22 रोजीचे रात्री 10.वाजून30 ते 11च्या दरम्यान यातील मृतक दुर्गेश राधेश्याम शेंन्डे वय 22 वर्ष रा. केदार लेआउट हा खा -रामदास तडस आय. टी. आय. कॉलेज देवळी येथे मित्रासह बसुन असतांना सदर गुन्हयांतील आरोपी नामे 1) वैभव रामभाउ दुरगडे वय – 26 रा. मिरननाथ मंदीर वार्ड क्र. 15 देवळी 2) शुभम नारायण मातकर वय 25 रा. कामडी चौक वार्ड क्र. 14 देवळी यांनी संगणमताने शेनिवारी झालेल्या वादाच्या कारणावरून दुर्गेश राधेश्याम शेंडे यास जिवे मारण्यांचे उददेशाने दोन्ही आरोपीतांनी शसस्त्र हमला करून आरोपीने आणलेल्या चाकूने हत्या केली व आरोपी वैभव रामभाउ दुरगडे याने सोबत आणलेल्या चाकुने मृतकाचे छातीवर व अंगावर वार करून जिवानिशी ठार केले आहे,याबाबत
देवळी पोलिसांना प्राप्त झालेल्या तकारीवरून आरोपीविरूध्द कलम 302,34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यांत आला आहे.
सदर गुन्हयांत यातील दोन्ही आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाल्याने देवळी पोलिसांनी यांचा शोध घेऊन रात्रीच या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
सदर प्रकरणांत यातील मृतक दुर्गेश शेंडे व दोन्ही आरोपी नामे वैभव दुरगडे व शुभम मातकर यांच्यात शुक्रवारी रात्री 11.00 वा. दरम्यान मिरननाथ मंदीर जवळील पानठेल्याजवळ वाद झाला होता. यास कारणावरून वचपा काढण्याच्या उददेशाने शनिवारी सायंकाळी सात वाजता लोखंडी रॉडने आरोपी वैभव दुर्गुडे याने मित्रासह मुर्तकाला मारहाण केली होती.याची मृतकाने देवळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती. देवळी पोलिसांनी कलम 324 भा.द.वी गुन्ह्याची नोंद केली होती.परंतु आरोपीला अटक झालेली नव्हती त्याच रात्री आरोपी वैभव दुर्गुडे ने दुर्गेश शेंडे वर शशस्त्र हल्ला करून जीवाशी ठार केले.
जर देवळी पोलिसांनी मृतकाच्या तक्रारीवर लगेच आरोपींनवर कारवाई केली असती तर एका तरुणाचा जीव वाचला असता देवळी पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईमुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला मागील काही दिवसापासून देवळी शहरात गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खासदार रामदास तडस यांनी चिंता जाहीर केली आहे देवळी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी चर्चा करणार असल्याचे असे त्यांनी सांगितले.
तसेच झालेल्या हत्येने देवळी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्थेची स्तिथी फारच नाजूक आहे जर वाढते गुन्हेगारीवर नियंत्रण न केल्यास यापेक्षाही मोठी घटना घडू शकते, पुढील तपास देवळी पोलीस स्टेशनं करीत आहे