येनिदोडका वाघाच्या जबड्यात ; गावकऱ्यांनी केली पुनर्वसनाची मागणी

By साहसिक न्युज 24
वर्धा/ प्रमोद पाणबुडे:
येनिदोडका गाव व्याघ्र प्रकल्पात येते. गावाच्या चारही बाजूने जंगल व्यापले आहे. गावाचे पुनर्वसण करण्या संदर्भात २०१२ ला आदेश काढण्यात आले होते. मात्र अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही. येनिदोडका गावाचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे असे पत्र आमदार दादाराव केचे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
कारंजा तालुक्यात येणारे येनीदोडका येथे जंगलात काड्या वेचण्यासाठी गेलेल्या सुशिला मंडारी (वय ६०) या वृद्ध मजूर महिलेची वाघाने शिकार केली. तर
अनिता मंडारी (वय ३० ) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गांव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. गावाचे पुनर्वसन करण्या संदर्भात सन २०१२ पासून मागणी असून या संदर्भात आदेशही काढण्यात आले आहे. मात्र अद्याप या गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. प्रस्तावित असलेल्या येनिदोडका गावाचे पुनर्वसन करण्यात यावे असे पत्र आमदार दादाराव केचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.