येरणवाडी मार्गे आलेल्या वाघोबाची पढेगावातून,चिकणी,जामणी,शिवाराकडे कूच.

0


नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज, वन विभागाची टीम पढेगाव शिवारात दाखल,

देवळी : आठ दिवसांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील येरणवाडी शिवारात वाघ दिसून आला होता आता हा वाघ पढेगाव चिकणी शिवारात असल्याचे वनविभागाच्या तपासणीत उघड झाले, या प्रवासादरम्यान वाघाने गाय, म्हैस, रोही आदी जनावरांची शिकार करून आपली भूक शमविली, मात्र आतापर्यंत मानवी जीवितहानी झाली नाही,ही जमेची बाजू आहे, या वाघाच्या पगमार्ग वरून हा वाघ नर असून अंदाजे ३ वर्षे वय असावेत, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे, हा वाघ पढेगाव चिकणी शिवारात असल्याचे निश्चित झाल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर, व नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे,
बुधवारी सकाळी दहा वाजता पढेगाव चिकणी शिवारात वाघाचा शोध घेण्यासाठी वर्धा वन विभागाची चमू अधिकाऱ्यांसह दाखल झाली, व वाघाचा शोध घेत असतांना पढेगाव शिवारात विठ्ठल गुजरकर, नामदेव मुडे, येसनकर यांच्या शेतात वाघाचे पगमार्ग दिसून आले, या पगमार्गाची वाटचाल चिकणी शिवाराकडे कूच करत असल्याचे दिसून आले, वनविभागाच्या चमू मध्ये उपवन संरक्षक राकेश शेफर्ड , सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, गणेश कावळे क्षेत्र सहाय्यक ,जी, एस, सयाम वडनेर, तसेच कणेरी, माने,कुटारे,कोटीवान तपासणी करीत आहे,

         

                वाघाचे मार्गक्रमण

हिंगणघाट तालुक्यातील येरणावाडी मार्गे शिरूड शिवरातून देवळी तालुक्यातील टाकळी(दरने), बोपापुर(दिघी) शिवरातून वर्धा तालुक्यातील वडद, सेलसुरा पढेगाव शिवरातून चिकणी,जामणी शिवाराकडे कूच,

मंगळवारच्या रात्री पढेगाव शिवरतच मुक्काम

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सेलसुरा शिवरातून पढेगाव शिवारात एन्ट्री केली, या परिसरात विठ्ठल गुजरकर यांच्या शेतात सायंकाळी वाघाचे पगमार्ग दिसून आले होते, तर बुधवारी सकाळी याच परिसरातील नामदेव मुडे, येसनकर यांच्या शेतात पगमार्ग दिसून आले,यामुळे मंगळवारी रात्री पढेगाव शिवरतच मुक्काम असल्याचे स्पष्ट झाले,

सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!