रखडलेल्या वेतनासाठी प्रेरीकांचे आंदोलन

0

प्रतिनिधी / वर्धा :

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्य करत असलेल्या प्रेरीका व कॅडरची गत दहा महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही.
ते तत्काळ देण्यात यावे या मागणीस अन्य मागण्यांना घेऊन युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या नेतृत्वात स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला प्रेरीका जिल्ह्यात तीन हजार महिला काम करत आहे. प्रेरीकांचे मानधन नेमके किती ? याची माहिती संबंधित विभाग देत नाही. अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक यांना भ्रमणध्वनीवरून मानधनाचा प्रश्न विचारला असता साडे तीन हजार रुपये सांगण्यात आले. प्रत्यक्ष मात्र तीन हजार मानधन देण्यात येत असल्याने नेकमे मानधन किती असा प्रश्न निर्णान झाला आहे. कंत्राटी कामगारांनाही कामावर घेतांना करार करण्यात येते मात्र येथे तसा करारही करण्यात न आल्याने सर्व्हेक्षणापासून तर अन्य बरीच कामे आपल्या जबाबदारीवर करावी लागते. बाहेर गावी कुठे जायचे असल्यास तसे काही अनुचित घडल्यासा स्वतः जबाबदार असल्याचे लेखी लिहून द्यावे लागते. अल्पशा मानधनात बचतगट तयार करणे, महिला जोडणे इतर व इतर ही अभियान अंतर्गत येणारे कार्य करून घेण्यात येते. अश्या परिस्थितीत महिला प्रमाणिकपणे आपली जबाबदारी पूर्ण करीत आहे. असे असताना जिल्ह्यातील प्रेरीका व कॅडरचे गत १० महिन्यापासून मानधन थकीत आहे. महिलाच्या समस्या लक्षात घेता त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यातआले.

अशा आहेत मागण्या

प्रेरीकांचे मानधन किती ? सांगण्यात यावे, सोबतच थकीत मानधन तत्काळ वाटप करण्यात यावे. प्रेरीकांच्या मानधनात वाढ करत मानधन किमान १० हजार करण्यात यावे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे काम करत असलेल्या प्रेरीकांच्या आरोग्य व जीवीतहानीची जबाबदारी शासनाने घ्यावी. सर्व प्रकारचा विमाचा लाभ देण्यात यावा. एमआयपी करीत असताना त्याचे वेगळे मानधन द्यावे. सर्व कॅडरला कोणताही करार न करता रेग्युलर ठेवावे व त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. कॅडरला ड्रेसकोड, आयकार्ड व प्रवास भत्ता देने आवश्यक. कॅडरचा मानधन हा डायरेक्ट त्यांचा खात्यात जमा करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!