🔥रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी तातडीने सोडा; – अतुल वांदिले🔥शेतकऱ्यांना केवळ १० टक्के पाणी मिळणार असेल, तर शेती करायची कशी आणि शेतकरी जगणार कसा?
🔥वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या ; राष्ट्रवादी काँग्रेसची वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक !
हिंगणघाट -/ वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
वर्धा जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून, या भागातील हजारो शेतकऱ्यांची शेती सिंचनाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून,गहू, हरभरा, चणा, भाजीपाला तसेच इतर पिकांच्या पेरणीसाठी आणि वाढीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, अद्याप कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
वडगाव प्रकल्प तसेच नांद (शेंडेस्वर) प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या अनेक गावांतील शेतकरी सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च करून पिकांची लागवड केली आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विहिरी व बोअरवेलच्या मर्यादित पाण्यावर संपूर्ण शेती करणे शक्य नसल्याने कालव्याचे पाणी वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.यासंदर्भात दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, निवेदन देऊनही आजपर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.जिल्हा प्रशासनाने तातडीने संबंधित पाटबंधारे व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वडगाव व नांद (शेंडेस्वर) प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करावे. तसेच हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वेसह वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून द्यावे. कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही समान न्यायाने पाणी मिळेल, याची दक्षता घ्यावी.
शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ पाणीपुरवठ्याचा नसून त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा आणि उपजीविकेचा आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वर्धा विधानसभा अध्यक्ष मिलिंद हिवलेकर,राजेंद्र शर्मा, युवक प्रदेश संघटक संदीप किटे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय नेहारोत्रा, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, सैनिक दल जिल्हाध्यक्ष प्रवीण पेठे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष देवतळे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष खलील खतीप, हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, समुद्रपूर तालुका अध्यक्ष राकेश चंदनखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा सरचिटणीस विनोद पांडे, हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, वर्धा शहर अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, पुलगाव शहर अध्यक्ष श्यामसुंदर देशमुख, सिंदी रेल्वे शहर अध्यक्ष सुमित तळवेकर,शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष शारदा केणे, नगरसेविका ज्योत्स्ना तडस, नगरसेविका दुर्गा बेलखोडे, नगरसेविका वर्षा बोबले, नंदा लोखंडे, जितेंद्र कुकसे,अनिल बुलानी,सुनील बोबले, नितीन देशमुख, प्रवीण कलोडे, अनिल लांबट, किशोर चांभारे, अजय परबत, साहेबराव येडे, गजानन गलांडे,नितीन भुते, जगदीश वांदिले, सुरेश डांगरी, विठ्ठल लेडे, दौलत येलगुंडे, संजय बोरेकर, देवराव बोरेकर झालं दामोदर वानखेडे, संदीप राऊत, चेतन चोरे, तुषार थुटे, पंकज विहीरकर, अंकित दांडेकर, आशिष कुंटेवार, सुधाकर धवणे, दिनकरराव धवणे, बंटी बेलखोडे, राहुल जाधव, पंकज भट्ट, हुकेश ढोकपांडे, अमर धनविज, राजू मुडे, राहुल भोयर, निखिल शेळके,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.