रविवार ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन.

0

हिंगणघाट: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला दिशादर्शक असे आहे. हे साहित्य कालसुसंगत व प्रासंगिक आहे. समाजाचे प्रबोधन ही निरंतर प्रक्रिया आहे.यादृष्टीने चिंतन व मनन व्हावे म्हणून गेल्या दहा वर्षापासून संमेलन आयोजित केले जात आहे. यावर्षीचे दहावे दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांत, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरूकुंज मोझरी व स्व.भास्करराव भीमनवार स्मृती व्याख्यान समिती हिंगणघाट यांच्या सयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्या वर दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 ला स्थानिक श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालय हिंगणघाट जि. वर्धा येथे आयोजित केले आहे. स्थानिक श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालयातील प्रागंणात सकाळी १०.15 वाजता संमेलनाचे उद्घाटन होत असुन. दोन परिसंवादांसह राष्ट्रसंतांच्या साहित्याची भरपूर मेजवानी, या संमेलनानिमित्त गुरुदेव भक्तांसह साहित्यिक व वाचकांना मिळणार आहे. स्थानिक श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालयातुन सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर सकाळी १0.15 वाजता संमेलनाध्यक्ष प्रा.श्यामसुंदरजी निचित उपाख्य श्यामबाबा ,संयोजक संत विमर्श विदर्भ अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत, गडचिरोली येथिल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या वेळी स्वागताध्यक्ष गोकुलदासजी राठी , अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरीचे प्रचारप्रमुख् प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. याप्रसंगी काही सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता ‘यह स्वर्गमय संसार हो” उच्चमत जीवनाचा अविष्कार , राष्ट्रसंत आणि हिंदुत्व तथा “ पावो सदा यशाला हा राष्ट्रधर्म माझा ” या विषयावर श्री.अभिजितजी हरकरे,नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून या परिसंवादात ह.भ.प.श्री. सोपानजी कनेरकर ,मोर्शी, डॉ. श्यामजी हटवादे नेरी , डॉ. अमृता इंदुरकर नागपूर सहभागी होतील. दुपारी २.३० वाजता ‘ग्रामनिर्माण व आत्मनिर्भर भारत ” , ग्रामगीता आणि मातृशक्ती वंदन,व राष्ट्रसंताच्या भजनातील परमेश्वर भक्तिची आर्तता, या विषयावर श्री. अशोकजी इटनकर , देवलापार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात श्री.अरविंदजी राठोड ,गरूकुंज मोझरी , सौ. सीमाताई पापळकर , दारव्हा , डॉ. माया पराते – रंभाळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता श्री. रविंद्रजी मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ होईल. या वेळी भारतीय विचार मंचचे विदर्भ प्रांत संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाचा समारोप होणार आहे. अशी माहिती श्रीमती सिरेकुँवरदेवी मोहता विद्यालयात आयोजित पत्रकार परिषेद मध्ये भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांताचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष लोहे ,संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोकुलदासजी राठी . स्व.भास्करराव भीमनवार स्मृती व्याख्यान समितीचे रमेशराव धारकर , श्यामभाऊ भीमनवार , संजयराव देशपांडे , संमेलन संयोजक विकास नागरकर , भारतीय विचार मंच,विदर्भ प्रांताचे धमेन्द्रजी मुधंडा , विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर खडतकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे नारायणराव खाडे, दिनेशजी हिवंज सहसंयोजक हेमंत महाजन आदीनी दिली पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक संमेलन संयोजक विकास नागरकर यानी केले. तर आभार प्रदर्शन सहसंयोजक हेमंत महाजन केले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!