रसुलाबाद मध्ये बैल पोळा साजरा,मकर पेटवण्याची परंपरा कायम,शेतकरी व नागरिकांचा मोठा सहभाग
आज रसुलाबाद मधील जुनी आठवडी बाजार च्या मैदानात बैल पोळा चे आजोजन करण्यात आले होते यावेळी गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे बैल चांगली सजावट आणि आकर्षक देखावे व वाजागाजा करीत शेतकऱ्यांनी बैल पोळा भरवण्यात आला यावेळी मकराचा बैलाचा मान श्रीकृष्णा तांबे यांचा बैलावर मकर पेटवण्यात आला यावेळी गावातील पोलीस पाटील ,कोतवाल , सरपंच आणि गावातील,सुतार , माली यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यांनी मकराचा बैलाच्या विधिवत पूजा करून मकर पेटवण्यात आला आणि पोळा हरहर महादेव चा गजर करीत बैल पोळा शांततेत पार पडला यावेळी गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैल जोडी सह पोळा सहभागी झाले होते.
संदीप रघाटाटे सहासिक न्यूज-24 रसुलाबाद