रसुलाबाद विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या अध्यक्ष उपाध्यक्षाची बिनविरोध निवड
By साहसिक न्युज 24
संदीप रघाटाटे/ रसुलाबाद:
रसुलाबाद विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक ७ मे रोजी पार पडली होती. त्यात प्रहार, भाजपा, सहकार यांच्या युतीचे १२ उमेदवार निवडून आले होते.२ जून ला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडनुक पार पडली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष यांची ग्रामपंचायत सभागृह मध्ये
बिन विरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष म्हणून निलेश रामभाऊ गवारले याची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून काजी करिमोद्दीन हमदोद्दीन यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी वनिता सावरकर , उमेशराव कणेरी, मनोहर भलमे, प्रभाकर कासार , सविता लोखंडे , रामराव कुहेकार , अशोक गुन्हाने,चंद्रकला सावरकर , सुभाष रघाटाटे , माया अनवाने यावेळी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विवेक वझरकर , गिरीश मोहरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.यावेळी रसुलाबाद चे सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे सर्व मतदार यांचे सर्वांनी आभार मानले.
आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे साहेब, आर्वी सहकार क्षेत्राच्या प्रमुख शोभा काळे, संदीप काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी सरपंच राजेश सावरकर, श्रावण गोंडूळे, दिलीप कणेरी, मंगेश सावरकर, मोहन गवारले, किशोर टाके, बाबाराव सावरकर, प्रशांत गुल्हाने, शालीक कुसराम, नारायण कुरहेकर, संजय सावरकर, विनोद इंगोले, राजु मानकर, प्रमोद बमनोटे यांच्यासह गावातील नागरिकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे अभिनंदन केले.