रामनगर पोलीसांची पुन्हा दमदार कारवाई, रामनगर हददीतील टोळी गुंडाची हालकपटटी, ५ गुन्हेगार केले हददपार.
वर्धा : मागील काळात पो.स्टे. रामनगर हददीत गावगुंडाची नेहमी हौदस असायची, अशातच सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला व त्याचेत भितीचे वातावरण निर्माण झाले. रामनगरचे ठाणेदार महेश चव्हाण यांनी पो.स्टे.चा कार्यभार सांभाळल्या पासुन अशा गावगुंडाना / टोळी गुडांवर वचक बसविण्यांकरीता, त्यांचेविरूध्द गोपनीयरित्या माहीत काढीत गुन्हेगाराची आराखडा तयार केला व त्यांना रामनगर हददीतुनच नाहीतर वर्धा जिल्हयांतुन हददपार करण्यांची कार्यवाही करीत मा. पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. नुरूल हसनयांचे मार्गदर्शनात मोहीम राबविली गेली.रामनगर हददीतील १) तुषार प्रभाकर बादलमवार रा. तुकाराम वार्ड रामनगर वर्धा २) रेहांश उर्फ सुरेश संतोष राजपुत रा. शांतीनगर सिंदी मेघे वर्धा ३) सौरभ प्रकाश गावंडे रा. भाईमारे लेआउट वर्धा ४) सुरज संतोष राजपुत रा. शांतीनगर सिंदी मेघे ५) विशाल रमेशराव बादलमवार रा. भाईमारे लेआउट सिंदी मेघे वर्धा असामाजीक तत्वांचे लोकांना सोबत घेवुन, गैरकायदयाची मंडळी जमवुन गुन्हा करणे, आनाधिकृपणे गृह प्रवेश करून मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न, हददपार आदेशांचे उल्लंघन करणे, हत्यार बागळणे, दारूचा व्यवसाय करून माराहण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे करून नेहमी शांतता भंग करणारे या इसमांवर लागलीच अॅक्शन घेत, त्यांचेवर हृददपार कारवाई करण्यांचा प्रस्ताव सादर केला. मा. पोलीस अधिक्षक सा. वर्धा. नुरूल हसन यांनी लागलीच दखल घेत, ५ गुन्हेगारांना जिल्हयातुन एक वर्षाकरीता हददपार करण्यांची मंजुरी देत, आदेश पारीत केले. सदरह आदेशाची तात्काळ अमलबजाणी करीता ठाणेदार महेश चव्हाण यांनी वेळ न घालविता, त्याचे अधिनस्त विशेष पथकातील सफौ / दिनेश कांबळे, पोहवा / अरूण धोटे, पोहवा / ज्ञानेश्वर निमजे, पोशि/ उदय दाते, पोशि/ विशाल देवकाते, नापोशि/ धर्मेन्द्र अकाली, नापोशि/ ऋषीकेश धंगारे, नापोशि/ सचीन दवाळे, नापोशि/ गजानन इवनाथे, पोशि/ चेतन पापले, पोशि/ अजय अनंतवार, पोशि/ प्रकाश खार्डे, पोशि/ मुकेश वांदीले यांचेहस्ते वर नमुद दारूविक्रेते यांना ताब्यात घेवुन वर्धा जिल्हयातुन इतर जिल्हयांत नेवुन सोडुन तडीपारची कार्यवाही केली.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार महेश चव्हाण यांनी स्वतः आपले अधिनस्त कर्मचारी सफौ / दिनेश कांबळे पोहवा / अरूण धोटे, पोहवा / ज्ञानेश्वर निमजे, पोशि/ उदय दाते, पोशि/ विशाल देवकाते, नापोशि/ धर्मेन्द्र अकाली नापोशि/ ऋषीकेश धंगारे, नापोशि/ सचीन दवाळे, नापोशि/ गजानन इवनाथे, पोशि/ चेतन पापले, पोशि/ अजर अनंतवार, पोशि/ प्रकाश खार्डे, पोशि/ मुकेश वांदीले यांनी मिळुन केलेली आहे.”यापुर्वी ईद ए मिलाद, गणेश उत्सव सण उत्साहाने व शांततेत पार पाडले आहे, दरम्यान हददीत शांतता व सुव्यवस्था राहावे, याकरीता रामनगर हददीतील एकुण १४ दारूविक्रेते / गुन्हेगाांवर एमपीडीए व हददपारची कार्यवाही केली आहे, अशाच प्रकारे सध्या दुर्गा उत्सव मोठया उत्सावाने सुरू असुन, हा उत्सव आनंददायी वातारणामध्ये व कोणताही अनुश्चीत प्रकार न घडावा, याकरीता पुन्हा या टोळीतील ५ गुन्हेगारांविरूध्द १ वर्षाकरीता हददपारची कार्यवाही केली आहे. आम्ही रामनगर हददीत शांतता व सुव्यवस्था राखण्यास सतत प्रयत्नशिल असुन, कायदा व सुव्यवस्था बाधीत करणारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवुन, त्यांचेवर वचक बसविण्याचा पुर्णपणे प्रयत्न करीत आहोत…
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज -24 वर्धा