राष्ट्रवादीचा परिवर्तन जनसंवाद यात्रेला पोहना येथून सुरुवात….

0

पोहण्यातील हेमाडपंथी शंकर मंदिरात अतूल वांदिले यांच्या हस्ते अभिषेक करुन यात्रेला सुरवात…..

२० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत संपूर्ण विधानसभा क्षेत्रात यात्रेच्या माध्यमातून होणार जनसंवाद.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अतूल वांदीले यांच्या नेतृत्वात झाली यात्रेला सुरुवात.

हिंगणघाट विधानसभेत अडीचशेच्यावर गावात होणारं जनतेशी संवाद.

यात्रे दरम्यान गावातच मुक्काम.

शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेणार जाणून.

सिंदी (रेल्वे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात परिवर्तन जनसंवाद यातेला पोहणा येथील हेमाडपंथी शंकर मंदिरातून अभिक्षेक करुन सुरवात करण्यात आली. माजी गृहमंत्री अनील देशमुख यांनी या यात्रेला हिरवी झेंडी दाखवत सूरवात करण्यात आली. हिंगणघाट, समुद्रपूर सिंदी (रेल्वे) विधानसभा क्षेत्रात दि २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत प्रत्येक गावोगावी व घरोघरी हि यात्रा पोहचणार आहे. हि परिवर्तन जनसंवाद यात्रा अतुल वांदिले यांचे नेतृत्वात हिंगणघाट मतदार क्षेत्रातील संपूर्ण गावात जाणार असून १९ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या यात्रेदरम्यान अतूल वांदीले व त्यांचे सहकारी गावा गावात मुक्काम करणारं असून यात्रा संपतपर्यंत विवीध गावातील मंदीर, शाळा हि मुक्कामाची जागा असणार आहे. घरगुती सिलेंडर, पेट्रोल, इलेक्ट्रीक बिल, यांचे गगनाला भिडलेल्या दरामुळे जनता मेटाकुटीस आली असून शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरीही कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. आज जीवनावश्यक वस्तूचे प्रचंड भाव वाढवून महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. ४१० रुपयाला मिळणारे सिलेंडर आता ९६० रुपयाला विकत घ्यावे लागत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशात भिडले आहे. ६० रुपये लिटरचे डिझेल ९५ रुपये वाढ झाली आहे. मुलांच्या शिक्षणाची फी वाढली, जीवनाश्यक वस्तुंवर ५% जीएसटी टॅक्स लावला जात आहे.बेरोजगाराची थट्टा लावली उच्च शिक्षित तरुणांसाठी कंत्राटी पध्दती सुरू करून शासन ठेकेदार बनलं. शाळा, महाविद्यालय, बस, रेल्वे याच खाजगीकरण सुरू झालं. ग्रामीण जनता औषध उपचाराअभावी मरणाचा दारात उभा आहे. ग्रामीण भागात दवाखाने नाही आणि दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, अशी विदारक परिस्थिती आपल्या मतदार संघामध्ये दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी जाणून बुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. कुठे नेऊन ठेवला आहे हिंगणघाट, समुद्रपूर,सिंदी (रेल्वे) मतदार संघ म्हणून आता वेळ परिवर्तनाची आली असून त्यासाठी परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सूनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश उपाध्यक्ष किशोर माथनकर, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, राजेश धोटे,अमोल बोरकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, सुनील भुते, जावेद मिर्झा, पोहना सरपंच नामदेवराव राऊत, माजी पंचायत समिती सदस्य ओंकारजी मानकर, तालूका अध्यक्ष राहुल वानखेडे, डॉ. वर्मा जेष्ठ नेते, दामोदर वानखेडे, अनिल कोंबे, माजी सरपंच डॉ. दिवाकर वानखेडे, नीलकंठ कटारिया, तुषार थुटे, सुनील दाते उपसरपंच, राहुल गजानन वानखेडे, सुमित बारापात्रे, अमोल राऊत, मोहन मसाळकर, जगदीश वांदिले, अमोल मुडे, गजू महाकाळकर, पंकज भट्ट, राजू मुडे, सचिन पाराशर, वैभव साठोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!