रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीच्या पोतावर परिणाम – राजेंद्र पेटकर.
सिंदी (रेल्वे) (श.प्र. ) : जलदगतीने उत्पादन घेण्यासाठी शेतशिवारात रासायनिक खतांचा अधिक उपयोग करण्यात येत असल्याने जमिनीत असणारी जैविकता नष्ट होत आहे. याचे दुष्परिणाम शेतकरी अनुभवत आहेत. यामुळे विषमुक्त शेतीकरिता सेंद्रिय शेती करायला पाहिजे, असे प्रतिपादन बजाज फाउंडेशनचे सेलू तालुका समन्वयक राजेंद्र पेटकर यांनी केले.ग्राम खापरी येथे नवदुर्गा उत्सव मंडळ व बजाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नैसर्गिक शेती चे फायदे आत्मनिर्भर कुटुंब पद्धती, शेतकरी आत्महत्येला आळा, वाढत्या बिमाऱ्यांवर नियंत्रण, कमी खर्चात शेती करून उत्पंनात वाढ, नैसर्गिक शेतीचा अवलंब, आरोग्यात सुधारणा, वाढत्या हृदयविकार आणि कॅन्सर सारख्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे रासायनिक शेती मुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रीती वैद्य होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील, नम्रता गव्हाळे, बजाज फाउंडेशनचे सेलू तालुका समन्वयक राजेंद्र पेटकर, प्रताप मंगरुळकर, अश्विनी कांबळे, वालेंटीयर ऋषिकेश भांडेकर ,गौरव सहारे, केशव कोठारे, बचत गटातील महिला प्रिया गव्हाळे, उज्वला पिंपळे, सरला दुधबडे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24 सिंदी रेल्वे