रा से यो स्वयंसेवकांनी घेतली आंतरराष्ट्रीय धोके निवारण दिन प्रतिज्ञा.

0

रासेयो पथकातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

सिंदी (रेल्वे) :स्व  रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालय सिंदी रेल्वेच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन व आंतरराष्ट्रीय धोके निवारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा उत्तम देवतळे, डॉ सतीश थेरे व रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर प्रामुख्याने उपस्थित होते.भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाची माहिती प्रमुख वक्ता डॉ सतीश थेरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. ‘वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री’ या संकल्पनांची ओळख देत विविध उदाहरणे देऊन वाचनाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व व डॉ. ए. पी. जे अब्दुल यांचे जीवन कार्य, खडतर प्रसंग प्रा उत्तम देवतळे यांनी पटवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात ‘आंतरराष्ट्रीय धोके निवारण दिन’ निमित्त प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. आपत्तीमुळे समाजाला निर्माण होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांतून जीवितांचे प्राण वाचविणे याबाबत जनजागृती करणे, हे या दिवसाचे मुख्य ध्येय आहे. लोकांनी हिरिरीने सहभागी व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी जीवित वित्त व पर्यावरण विषयक हानी होऊ देणार नाही याबद्दल कटिबद्ध राहील अशी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञाचे वाचन रा से यो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन त्रुज्या वाटकर, मनोगत ऐश्वर्या भगत, प्रास्ताविक प्रा गुजरकर तर आभार प्रदर्शन रचना वैद्य हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24 सिंदी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!