रेती माफिया गौतम पोपटकर ला तात्काळ अटक करा-राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेची मागणी

0

 

प्रतिनिधी/ देवळी:

देवळी तालुक्यातील अडेगाव येथे पाच दिवसा अगोदर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर वर काम करणारे दोन मजुर जागीच ठार झाले होते. याप्रकरणी देवळी पोलिसानी ट्रॅक्टर मालक माजी नागराध्यक्ष व विद्यमान असलेले नगरसेवक गौतम पोपटकर यांच्या मालकीचा तो ट्रॅक्टर असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पोपटकर यांनी पैश्याच्या जोरावर पोलिसाना गप्प केले. गौतम पोपटकर हे देवळी तालुक्यातील मोठे रेती माफिया आहे. यामुळे पोलीसही त्यांना अटक करत नव्हते. आज राष्ट्रीय लहूशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास डोंगरे यांनी व यांच्या कार्यकर्त्यांनी देवळी येथील ठाणेदारांना निवेदन दिले व त्यामध्ये नमूद केले रेती चोर गौतम पोपटकर यांना त्या दोन मृत पावलेल्या मजुरांना न्याय मिळवून द्यावे अन्यथा राष्ट्रीय लहुशक्ती संघटने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. निवेदन देताच देवळी येथील ठाणेदार राणे यांनी लगेच आपले एक पथक पाठवून गौतम पोपटकर यांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टेशन ला आणले वृत्तलिहेस्तोवर अटक करण्यात आलेली नव्हती… काय पोलीस गौतम पोपटकरांना रात्र होताच सोडून देतील की त्या दोन मृतकांना न्याय मिळवून देतील याकडे देवळी वासियांचे लक्ष्य लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!