लिंगापुर प्राथमिक शाळेची परसबाग जिल्ह्यातुन प्रथम..

0

आष्टी शहीद : ग्रामपंचायत लहान आर्वी कक्षेत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंगापूर येथील शाळेच्या परसबागेला वर्धा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून लिंगापूर शाळेचे मुख्याध्यापक निलेश इंगळे तथा शाळेतील विद्यार्थी व पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लिंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मा. प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत सुंदर अशी परसबाग तयार करण्यात आली असून या परसबागेमध्ये पालक, मेथी ,कोथिंबीर ,फुलकोबी, टमाटर, गाजर, बीट ,लौकी , मुळा ,वांगी ,मिरची ,वाल, अंबाडी, वाटाणा, दोडका ,फ्रेंच बीन यासारख्या एकूण 21 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. तसेच विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. परस बागेमध्ये लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्या साठी देशी वानाची निवड करण्यात आली असून संपूर्ण परसबाग ही “सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आली आहे सदर परस बागेला गावातील लोकसभाग लाभला असून अगदी कमी खर्चामध्ये ही परसबाग तयार करण्यात आली आहे. सदर परसबागेचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे स्थानिक शेतकरी व युवक वर्ग परसबाग पाहण्यासाठी व शेतीविषयक संकल्पना समजून घेण्यासाठी शाळेला भेट देत असल्याचे दिसून येत आहे . एक शिक्षकी शाळेने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून या शाळेचे कौतुक होत आहे.शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री निलेश इंगळे तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा.भाग्यश्रीताई निंभोरकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचे सरपंच सुनील साबळे तसेच पोलीस पाटील विक्रम निंभोरकर ग्रामपंचायत सदस्य कांताताई इंगोले ,मारुती उईके आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  प्रमोदजी. देशपांडे यांनी अभिनंदन केले.

नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 शहीद आष्टी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!