वनविभागाच्या वाहनांच्या धडकेत पती ठार, पत्नी बचावली

0

साहसिक न्युज 24 :प्रमोद पाणबुडे/ वर्धा : वर्ध्यातील कारंजा शहरातून जाणाऱ्या गवंडी रस्त्यावर एक दाम्पत्य रात्री जेवण आटोपल्यानंतर शतपावली करत असताना मागून येणाऱ्या वनविभागाची भरधाव वाहन क्र. महा.३२ जी ०१८१ च्या चालकाने धडक दिली. या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी थोडक्यात बचावली. ही घटना शनिवारी रात्री 9.10 वाजता घडली.

भोजराज आत्माराम गाखरे ( वय 50) रा. कारंजा अस मृत शिक्षकांचे नाव आहे. अगदी घराशेजारी असलेला गवंडी मार्गवर दोघेही पतिपत्नी दररोज रात्री शतपावली करायचे. रात्री ही सोबत दोघेही दाम्पत्य शतपावली करत होते. एवढ्यात मागून चालकाने निष्काळजी पणाने वनविभागाचे भरधाव वेगाने वाहन चालवत धडक दिली. यात पत्नी उषा गाखरे या थोडक्यात बचवल्या. अपघात घडताच चालकाच्या ताब्यातील वनविभागाचे वाहना रस्त्याच्या कडेला घुसली. यावरून वाहन किती वेगात होते हे समजते, या वाहनावरील चालक हा खासगी चालक राजू उईके असे नावाचा होता असून तो मद्यधुंदित वाहन चालवत होता असे स्थानिक उपस्थित नागरिकांनी संगितले.अपघात घडताच चालक आपल्या ताब्यातील वाहन सोडून घटनास्थळावरून पळून जात पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित चालकांची मनमानी

वनविभाग कार्यालयात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी अनुपस्थित असताना रात्री खासगी चालक मद्यधुंदीत कार्यलयातून वाहन स्वतःच्या घरी नेत असताना वाटेतच अपघात घडला. वनविभागाचे चक्क वाहन खासगी चालकाने मद्यधुंद अवस्थेत वनविभागाच्या कार्यालयातून स्वतःच्या घरी भरधाव नेत असताना शिक्षकाला धडक दिली.अपघात इतका भयंकर होता की निष्पाप शिक्षकांचा घटनास्थळी मृत्यू झाला.वनविभागात कार्यरत असलेला खासगी चालक हा मनमानी कारभार करत असल्याचे बोलले जात आहे.मनमर्जी वाहन कोठेही घेऊन जायचा कोणी संबंधित कर्मचाऱ्यांनी हटकल्यास त्यांच्याशी वाद करत असल्याची चर्चा आहे.

अखेर वनविभागाच्या खासगी चालकांवर गुन्हा दाखल

गवंडी रस्त्यावर अपघात घडताच वनविभाग वाहनाचा चालक कारंजा पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या वाहनावरील खासगी चालक राजू पंजाब उईके याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी त्याच्यावर भांदवी कलम 279,337,338,304 सह184,134 या कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!