वरोरा येथून चोरी केलेल्या चोरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद.
चार आरोपींना मुद्देमालासह अटक..
हिंगणघाट : वरोरा नजीकच्या नजीकच्या पावर प्लांट कंपनीतून चोरी करून पळालेल्या चार आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी ट्रक तसेच पाइप असा एकूण ११ लाख ५ हजार ५५० रुपये मुद्देमालासह अटक करण्यात आली.सदर प्रकरणी अल्ताफ इसराइल शेख (३०) रा. करंजी तालुका केळापूर,मोबीन मुन्ना शेख रहीम (२२), प्रज्वल देविदास उमरे,रा. राजुर ता.वणी तसेच सय्यद इमरान सय्यद हुसेन (३१) रा. शास्त्रीनगर,वणी यांना हिंगणघाट पोलिसांनी ट्रक क्र.एमएच.३४/बिजी- ५५३६ मधून वाहतूक करतांना १६ लोखंडी पाईपसह ताब्यात घेतले. सदर आरोपीवर हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अपराध ०१/२०२३ अन्वये कलम ४१(१)(ड) अंतर्गत गुन्हा नोंद केला.
आरोपी जमील शेख रा.राजुर तसेच अलीम शेख मु.पांढरकवडा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नागपूर रोडवरील पावर प्लांट कंपनी परिसरातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उपरोक्त चोरी प्रकरणी वरोरा पोलिसात गुन्हा नोंद असल्याची असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे.
सदरची कामगिरी ठाणेदार मारोती मुळुक, यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.सी.प्रशांत ठोंबरे, चंदु वाढवे, विशाल बंगाले, सचिन घेवंदे, भुषण भोयर यांनी केली आहे,
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज -24