वर्धा जिल्हा शिवसेनेत नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख हटाव मोहीम..

0

गेल्या चार महिन्याअगोदर वर्धा जिल्हात शिवसेनेसाठी नवीन जिल्हा संपर्कप्रमुख पदावर निलेश धुमाळ यांची नेमणूक झाली. त्यांनी आपल्याबरोबर पदाधिकारी बदलण्याची मोहीम हाती घेतली.त्यानुसार जिल्हाप्रमुख बदलून नवीन जिल्हा प्रमुखाचे नियुक्ती करण्यात आली. हे सर्व आर्थिक तळजोळीतून झाल्याची पक्षांतर्गत सर्व दूर चर्चा झाली. या आर्थिक देवाणघेवानीचे अनुभव जुन्या आणि नवीन जिल्हा प्रमुखांना आले आणि त्यातून जिल्हा संपर्क संपर्कप्रमुख हटाव मोहीम सुरू झाल्याची चर्चा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आहे.गेल्या आठ दिवसाआधी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वायगाव जवळ गोपनीय बैठक झाली. यात सर्वानुमते जिल्हा संपर्कप्रमुख बदलणे बाबत ठराव घेण्यात येऊन त्या संदर्भात माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले यावेळी धुमाळ यांची कार्यशाली जिल्हा संपर्कप्रमुख पदाला न न शोभणारी असून पदाधिकारी नेमणूक करताना पैशाची मागणी तसेच जिल्ह्यातील कलंकित व्यक्तींना पैशाच्या जागेवर नेमणूक देण्याची प्रक्रिया अशोभनीय आहे. असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. स्थानिक पदाधिकारी निष्ठावंत सैनिकांना विश्वासात न घेता विद्रोही वसुली करणारे नशेत थर असणाऱ्यांना व्यक्तीला मुंबईला बोलावून ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घालून त्यांची शिफारस करणे असले निंदनीय प्रकार निलेश धुमाळ करत असल्यामुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख निर्देश धुमाळ यांच्या विरुद्ध शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे. हे बंधन थांबणारे असून वरिष्ठांनी धुमाळ यांना न बदलल्यास त्यांच्या दौऱ्यावर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहिष्कार टाकणार असल्याचे समजते. सध्या तरी जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनाही बंड तात्पुरते थांबविण्यात यश आल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून प्रश्नांनी अस्वस्थ केल्याचे समजते. परंतु या हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्हा संपर्कप्रमुख बदलला नाही तर जिल्ह्यातील चार उपजिल्हाप्रमुख आठ तालुकाप्रमुख जिल्हा परिषद विभाग प्रमुख पंचायत समिती उपविभाग प्रमुख शहर प्रमुख उपशहर प्रमुख सामूहिक देणार हे निश्चित झाले आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!