वर्धा जिल्ह्यातील ५०० गावांना बसणार पाणिटंचाईची झळ १०

0

प्रमोद पाणबुडे/ वर्धा:

उन्हाळा येताच पाणीटंचाई जिल्ह्यात डोके वर काढते. यंदा जिल्ह्यात ५०० गावांत पाणी टंजाईच्या झळा बसणार असल्याचे नियोजन जिल्ह्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यावर पहिल्या टप्प्यात २९७ गावांकरिता उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यावर नऊ कोटी ३० लाख ४३ हजार रुपयाचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आला असून मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
शासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. असे असले तरी त्याच्या अंमलबजावणीत तृट्या राहिल्याने पाणीप्रश्न जिल्ह्यात गंभीर होताना दिसून येत आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होणार नाही असे वाटले होते. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई जाणऊ लागल्याने प्रशानाकडून विविध उपययोजना हाती घेतल्या आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या २९७ गावात ६५१ उपाययोजनेचा अराखडा तयार करण्यात आला आहे.
आतापर्यंत टँकरमुक्त असलेल्या जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. आराखड्यात १० गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ती गावे कोणती याचा सध्या त्यात उल्लेख मात्र नाही.
————————-
– ७५ गावातील १५२ सार्वजनिक विहिरींचे खोलिकरण
– ९५ गावासाठी १०४ खासगी विहिरींचे अधिग्रहण
– १९७ गावात नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीची २०० कामे
– १११ गावात १६३ नवीन हातपंप
– २२ गावात बिघडलेल्या हातपंपाची दुरुस्ती
…………………
पंचायत पाणीटंचाई उपाय योजना अपेक्षीत
समिती ग्रस्त गावे संख्या निधी
आर्वी ५३ १७६ १९१.८१
आष्टी २७ ६१ १०६.८०
कारंजा ३१ ६८ १०७.०३
वर्धा २६ ६८ ८६.४४
सेलू ३५ ५८ ८७.३३
देवळी ४३ ४७ ७२.३४
हिंगणघाट २१ ३२ ४९४२
समुद्रपूर ७० १४१ २२९.२६
एकूण २९७ ६५१ ९३०.६३
…………….
जानेवारी ते मार्च या काळात पाणीटंचाईसाठी सव्वा नऊ कोटीच्या निधीतून उपाययोजना करण्यात येत आहे. मार्च नंतर पाणीटंचाई भेडसावणाऱ्या जवळपास २५० गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात उपययोजनांसाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी सादर केला आहे.
-प्रशांत मेश्राम,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!