वर्धा नगर रचनाकार कार्यालयातिल दलालांच्या मांडीवरचा आरोपी लोक सेवक, कुनाल मोरेसिया वर्धा लाचलुचपत विभागाच्या जाळात: ४० हजाराची लाच घेण्याच्या आरोपात अटक

0

By साहासिक न्यूज-24:
प्रतीनिधी/वर्धा.
शासन लोकसेवेत कितीही कडक कायदे निर्गमित करतील पण जवळपास सर्वचं कायाद्याच्या आड चालणारा मूळ व्यवसाय म्हणजेचं भ्रष्टाचार जो कधी न संपणारा विषय आहे, प्रत्येक सरकारी नौकर ज्याला लोकशाहीच्या भाषेत “लोक सेवक” या नावाने संबोधले जाते.! पण तोच शेतकर्‍यांपेक्षा व इतर व्यावसायिकांपेक्षा अतिशय श्रीमंत आणि चार चाकी वाहनात फिरणारा असतो हे सर्वविदित आहेत, ज्यामुळे प्रत्येक युवा पिढिंमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा दाट भरून असते आणि अशी इच्छा जागृत करण्याचे प्रोत्साहन या “भामट्या” आरोपी लोक सेवक कुणाल मोरेसिया सारखा “लुचाड” सहायक नगर रचनाकार करत असतो.
सदरचे वृत्त असे की, शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांनुसार काही शासकीय कार्यालयांना अधिक वट मिळाला आहे, त्यातलेच नगर रचनाकार कार्यालय, वर्धा जिथे एक सहायक सचिव या गरिमामय पदाच्या बराबरीचा लोक सेवक तथा सक्षम प्राधिकारी म्हणजेचं सहायक संचालक, नगर रचनाकार विभाग हे अतिशय महत्वाचे पद असून त्याच्याचं नियंत्रणात व देखरेखेत त्याचाचं सहायक नगर रचनाकार कुणाल मोरेसिया हा “भाडखावू” निघाला.
एकीकडे शासन नागरिक जागरूक होण्याकरिता व प्रत्येक नागरिकाला आपले महत्व, अधिकार व कायद्याचे ज्ञानवर्धन तसेच शासन व नागरिक यांच्यात सामंजस्य टिकवून राहण्याच्या उद्देशाने प्रत्येक शासकीय कर्मचार्‍याला लोकसेवेत रुजू होण्याच्या बरोबरचं काही “नैतिकतेची मूल्ये” अंगीकृत करण्याची जबाबदारी सोपविते. येवढेच नव्हे तर शासन प्रत्येक शासकीय कर्मचार्‍याला लोकसेवेकरिता पर्याप्त सुख-सुविधा, संरक्षण सुद्धा देते, की प्रत्येक शासकीय कर्मचार्‍याने/अधिकार्‍याने आपली जबाबदारी निष्पक्षपणे व नागरिकांप्रती निष्ठेने पार पाडावी. परंतु आज विद्यमान काळात या “भामट्या” कुणाल मोरेसिया सारख्या “लुचाड” कर्मच्यार्‍यामुळे प्रत्येक नागरिक हा आपल्या अधिकारांपासून वंचित राहून त्याचे शोषण होत आहे.
सुरवातीच्या काळात नागरिकांना त्यांच्या भूमीवर कोणतेही विकासकाम करण्याअगोदर संबंधित विभागाची बांधकाम परवानगी व इतर विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रे घेणे आवश्यक होते तीच प्रक्रिया आत्तासुद्धा आहेत. दरम्यान सगळीकडे विकासकामांवर भर दिली जात असल्याने शासनाने एकत्रिकृत विकास नियंत्रण व नियोजन नियमावली म्हणजेच UDCPR-२०२० निर्गमित केले असून त्याआधारे कोणत्याही भूखंडावरील विकासकाम सुसंगत असणे या नियमावलीतील दिशानिर्देशांनुसार आवश्यक आहेत. आता या विकासकामाबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रस्तावित कामाचा शासन मान्य अभियंत्याकडून नकाशा तयार करणे व तो नकाशा बरोबर आहे किंवा नाहे हे तपासण्याचे काम मात्र नगर रचनाकार यांचे असते. त्याकरिता, शासनाने नगर रचनाकार यांच्याकडे आलेल्या प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करिता शासनाच्या UDCPR नुसार ६० दिवसाचा कालावधीसुद्धा निश्चित केलेला आहे.
वर्ध्याच्या नगर रचनाकार या कार्यालयात याच कामाकरिता नियुक्त “भामट्या” आरोपी “लोकसेवक” कुणाल मोरेसिया ज्याचं मूळ काम म्हणजेचं तपासणीकामी आलेल्या नकाश्याची शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे तपासणी करणे व आवश्यक मार्गदर्शनार्थ त्याचाचं बॉस सहायक संचालक “सोनारे” यांच्याकडे पाठविणे असे विधिवत असताना, उलट, आलेल्या कामांवर आपल्या जबाबदारीचे काम करण्याऐवजी, “भामट्या” कुणाल नागरिकांना म्हणतो की, “तुम्हाला यातले कळते का ? तुम्ही एजेंटकडून प्रस्ताव का नाही पाठवत”, तुम्हाला आमच्याकडे येण्याचे काही कारण नाही, आम्ही आमचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवतो त्यांचेकडून तुमचे प्रकरण घेवून जा…” तसेच एखाद्याने त्याच्या कामाच्या फाइल बद्दल विचारणा केल्यास त्यांस खडे बोल सुनावल्या जाते की, “तुमची फाइल दिसत नाही, शोधायला सांगते…” अश्याप्रकारे नागरिकांना उर्मटपणाची वागणूक देवून अपमानित करीत असल्यामुळे ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ म्हणण्याची वेळ येत आहे.
अश्याच प्रकारचे ट्रेनिंग या “भामट्या” कुणाल चा साथीदार “सावकारे” यालासुद्धा आहे, हा तर चक्क दलालांना वगळून नागरिकांनाचं कायद्याचे ज्ञान शिकवितो, म्हणतो – “माहितीचे अधिकार टाका किंवा आणखी काहीही टाका, आम्ही तुम्हाला आमचे कागदपत्रे देणार नाही”, जसे काही प्रत्येक शासकीय अभिलेखिय दस्तऐवज याच्या बापाचे बँक पासबुकचं आहे…..!
या कार्यालयात कर्मचार्‍यांवर अधिकार्‍यांचा अंकुश नसल्यामुळे कर्मचारी वेळेत काम न करता, आलेल्या लोकांवरचं आपली “पॉवर” दाखवत असल्याचे दिसून येते. कामासाठी आलेला माणूस पश्चताप करून घरची वाट धरत असल्यामुळे या कार्यालयातील कर्मचार्‍यांना आवर कोण घालणार ? असा यक्ष सवाल निर्माण झाला आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, नागरिकांसाठी यांचे कार्यालय ५ वाजता बंद होते आणि दलांसाठी रात्री उशिरा पर्यन्त उघडे असते….! असे का ? सहायक संचालक सोनारे सांगा आत्ता …………!
नगर रचनाकार यांच्या कार्यालयात दररोज केवळ “अभियंता-दलाल” यांची गर्दी दिसते, एखाद्या नागरिकाचा त्याच्या कामासाठी जर त्या कार्यालयातील एखाद्या सहायक नगररचनाकाराशी वाद झाला तर हे सगळे “दलाल” पुढचे महिनाभर त्या नागरिकांकडे पाहत राहते…. ! जसे काही त्यांच्या बापाच्या तेरवीत तो नागरिक जेवायला आला……!
सहायक संचालक यांच्याच कार्यालयाची अशी निर्दयी व्यवस्था असताना तिथे रोख व्यवहार कसे काय चालते, याचाच सवाल नागरिकांमध्ये दिसतो…? पण त्यामागचे सत्य वचन म्हणजे त्या कार्यालयातील प्रत्येक सहायक नगर रचनाकार यांचे मानीव “दलाल”. मग अशातचं एखादा “भामट्या कुणाल” ACB च्या जाळात फसल्यावर सर्वांची पंढरी घाबरते, पण दलाल मात्र सुज्ज, हे दलाल कधी ACB च्या रडारवर येईल याची शक्यतासुद्धा नाकरता येत नाही, कारण भ्रष्टाचाराचा अंत शेवटी कोठडीतचं, म्हणून काळ संपत नाही, आज या “भामट्या कुणाल मोरेसिया” चा दिवस निघाला व अगदी सहजपणे हा “लोकसेवक कुत्रा” लाचलुचपत विभागाच्या जाळात अडकला, या भामट्या कुणाल बद्दल सविस्तर असे की, हा सहायक नगर रचनाकार या पदावर शासकीय कर्मचारी असून तो शाखा कार्यालय वर्धा, येथे कार्यरत आहे. आरोपी कुणाल मूळचा राहणारा जयप्रकाश वार्ड, रामटेक ता. रामटेक जि. नागपुर चा असून याने ४०,०००/- रुपये लाच मांगणी केल्याचे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पडताळनी अंती निष्पन्न झाल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांचेकडून कार्यवाही करण्यात आली. तक्रारदार रा. महादेवपुरा, तिळक चौक, गोल बाजार, वर्धा. यांनी दि . ३०/०५/२०२२ ते ०१/०७/२०२२ दरम्यान लाच लुचपत प्रतिबंध, वर्धा यांच्याकडे आरोपी कुनाल मोरेसिया सहायक नगर रचनाकार, नगर रचना वर्धा याच्या विरुध्द लाच मागणी बाबत दिलेल्या तकारीवरून दोन पंचासमक्ष दि. ३०/०५/२०२२ ला पंचनामा केल्यानुसार पडताळणी कार्यवाही केली असता आरोपी यानी तक्रारदाराचे तक्रारीतील नमुद कारणा करीता ६५,०००/- रू. लाचेची मागणी करून गं. अ. मोरेसिया यांने तक्रारदार यांचे कडुन तडजोडी अंती ४०,०००/- रु. याची लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने आरोपी मोरेसिया यांनी आपले पदाचा दुरूपयोग केला असल्याबाबत लाच मागणी पडताळणीत निष्पन्न झाले.
तक्रारदाराने दिलेल्या लेखी तकारीवरून लाच मागणी संबंधाने पडताळणी करण्यात आली असता, आरोपी कुनाल मोरेशिया, याने तक्रारदार यांची फाईल आरोपी यांच्या ताब्यात असुन फाईल अडकावुन या अगोदर केलेल्या पोद्दार ले-आउट सेवाग्राम, ता. वर्धा येथील सहा, रो- हाउस चे झालेल्या बांधकामाचे ३००००/- रुपये तसेच सध्याचे संस्कार स्कूल बरबडी चे बांधकाम नकाशा मंजुरी करीता ३५०००/- हजार रुपये असे एकूण रूपयांची तक्रारकर्त्यास लाच मागणी केली व तडजोडी अंती ४०,०००/- स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने पडताळणीत निष्पन्न झाले असल्याने त्याचे कृत्य कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८ (सुधारणा अधिनियम सन २०१८) अन्वये गुन्हा होत असल्याने त्यांचे विरूध्द पो. स्टे. वर्धा शहर जि. वर्धा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, राकेश ओला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, मधुकर गिते अप्पर पोलीस अधीक्षक तसेच सचिन मत्ते, वाचक पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात डि. सी. खंडेराव, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. वर्धा, पोलीस निरीक्षक संदिप थडवे, स.फौ. रविन्द्र बावणेर, पो.हवा. संतोष बावणकुळे ना.पो.का. सागर भोसले, म.ना.पो.का. अपर्णा गिरजापुरे, पो.का. कैलास वालदे, पो.का. प्रदिप कचनकर, पो.का. प्रशांत मानमोडे, पो.का. प्रितम इंगळे, पो.का. मनिष मसराम, चा.ना.पो.का. निलेश महाजन सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वर्धा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.
लोकतांत्रिक व्यवस्थेत ही अतिशय महत्वाची कार्यवाही झाली असून पुढे सहायक संचालक नगर रचनाकार, शाखा कार्यालय, वर्धा या कार्यालयातिल भ्रष्टाचार उघड करण्यास नक्कीच मदत होईल, नगर रचनाकार कार्यालय, व राजस्व विभागातील कार्यालयें यापासून जो नागरिक दलालांच्या मागे जात नाही, त्यांस या कार्यालयातील अधिकारी/कर्मचार्‍यांकडून अतोनात त्रास सहन करावा लागतो, या कार्यवाहीच्या प्रभावाने नगर रचनाकार, वर्धा यांच्या कार्यालयातील CCTV चा CDR काढून तपासणी यंत्रणेकडे देण्याचे सुद्धा नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!