*वर्धा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी* *पाच तासातच केले तब्बल कोटी रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात*

*वर्धा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*
*पाच तासातच केले तब्बल कोटी रुपये चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात*
*सहासिक न्यूज-24*
*सागर झोरे/वर्धा*
वर्धा नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात पाच कोटी रुपये घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला अवघ्या पाच तासात अटक करण्यात वर्धा पोलीस अधीक्षक यांनी रचलेल्या शंभर सहाय्यकाच्या चमूने साडेतीन कोटी रुपयाची रक्कम हस्तगत करण्याला यश मिळवले.महाराष्ट्रातील एवढी मोठी रक्कम वर्धा पोलिसांना हस्तगत करण्यात पहिल्यांदाच यश आले नागपूर हैदराबाद महामार्ग क्रमांक सात वरून पाच कोटी रुपये बंदुकीचे धाक दाखवून लुटले अशी माहिती वर्धा पोलीस अधीक्षकांना माहिती मिळताच स्वतःहिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशन हद्दीत पोहोचून आरोपांना पकडण्याचा सापळा रचला यामध्ये रक्कम घेऊन जाणारी टोळी नागपूरकडे जात असलेले लक्षात येता नुरुल हसन यांनी यवतमाळ नागपूर ग्रामीण शहर व वर्धा स्थानिक गुन्हे शाखा यातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांना मार्गावर ठेवून नागपूर शहरातील अंबाझरी परिसरातील तांत्रिक परिस्थिती हातळून तीन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळील तब्ब्ल तीन कोटी २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. यातील एक आरोपी फरार झाला असून त्याच्याकडे एक कोटी ८५ लाख रुपये आहे अशी माहिती मिळाली आहे.उर्वरित रक्कम एक कोटी ८५ लाख रुपये शोधार्थ पोलीस चमू कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी माहिती दिली असून पुढील तपास वर्धा पोलीस करीत आहे.