वर्ध्यातील जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महिलांचा घागर मोर्चा
By साहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
शांती नगर, सिंदी मेघे येथे एक हजार लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी रोजमंजूरी वर्गातील लोक राहतात . पाण्यासाठी पंधरा दिवसापासून वारंवार ग्रामपंचायत कडे टँकरची मागणी केल्या गेली. त्यानंतर फक्त ग्रामपंचायतने टँकर पाठविला पण दोन दिवस.यामुळे येथील नागरिक संतापले आणि थेट जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी घांगर मोर्चा काढून जि प कार्यालयात ठिय्या मांडला. ग्रामपंचायत सिंदी मेघे येथील स्वतःचा टँकर खासगी कामासाठी वापर करतात आणि नागरिकांना आज पाणी देतो उद्या पाणी देतो असे सांगतात. शांतीनगर येथील नागरिक हे रोजमजुरी करतात यामुळे दिवसभर रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी अर्धा अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. सिंदी मेघेच्या काही भागात पंधराव्या वित्त आयोगातून निःशुल्क नळ जोडणी सुरू आहे. पण ग्रामपंचायत व ठेकेदार अनेक नागरिकांना २५०० ते ३००० रुपये नळ जोडणी साठी पैसे वसूल करत आहे. शांतीनगर येथे अजूनही एकही कुटुंबात नळ दिला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहे. म्हणून आज पुन्हा पाण्याचा टँकर बंद केल्याने शांतीनगर येथील महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयात घांगर डोक्यावर घेऊन धडक दिली. तिथे कोणी अधिकारी नसल्याने सर्व महिलानी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा वळविला व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपले गराने मांडले तसेच हि समस्या निकाली न निघाल्यास आठ दिवसांत पुन्हा मोठे आंदोलन करून रस्ता जाम करण्यात येईल असा इशारा यावेळी सिंदी मेघे शांतीनगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे.