वर्धेच्या रायगडावर दोन गटांत ‘फ्री स्टाईल’ ; एक जखमी

0

साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/वर्धा:
वॉर्डातील कामांच्या टेंडरवरुन दोन माजी नगरसेवकांमध्ये वाद झाला. दरम्यान, दोन गटातील समर्थकांमध्ये फ्री स्टाईल नगरपालिकेच्या आवारात आज 10 रोजी सायंकाळी 5.25 वाजताच्या सुमारास झाली. या घटनेत वॉर्ड 19 मधील माजी नगरसेवक परवेज खान आणि नपचे कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक जखमी झाले. या घटनेची माहिती नगरपालिका प्रशासनाने पोलिसांना दिली असता पोलिसांनी तत्काळ नगरपालिकेत धाव घेतली.
माजी नगरसेवक परवेज खान यांच्या वॉर्ड 19 मध्ये कंत्राटदार रामू लष्कर कामं करीत आहे. कंत्राटदार रामू लष्कर हा माजी नगरसेवक शेख सलीम उर्फ सल्लू यांच्या गटाचा आहे. परवेज गट आणि शेख सलीम या दोन्ही गटात कामांच्या टेंडवरुन वाद सुरू आहे. यासंदर्भात दोन्ही गटातील पदाधिकारी न प मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासोबत याबाबत चर्चा केली होती. दरम्यान मुख्याधिकारी भगत यांनी लिखित स्वरुपात तक्रारी द्या, नियमानुसार नप कडून कारवाई केल्या जाईल, असे सांगितले.
मुख्याधिकार्‍यांसोबत चर्चा झाल्यानंतर शेख सलीम उर्फ सल्लू याच्या गटातील कंत्राटदार रामू लष्कर नपच्या आवारातून बाहेर जात असतानाच माजी नगरसेवक परवेज खान तेथे आला आणि दोघात वाद झाला. दोन्ही गटांत चांगलीच हाणामारी झाली. ही हाणामारी थांबविण्यासाठी नप कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक मध्यस्थी गेले असता तेही जखमी झाले.
माजी नगरसेवक असलेल्या दोन्ही गटातील समर्थकांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोरच राडा घातला. यात एका माजी नगरसेवकाला जखमही झाली. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड करुन नपचे नुकसान केले.त्या दोनही गट शहर ठाण्यात पोहचले.वुत्त लिहेस्तोवर कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!