वर्ध्यातील नविन जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरचा दर्जा ठरविणार कोण
जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचरचा दर्जा ठरविणार कोण
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तयार झाली आणि त्याचे उदघाटन देखील होत आहे. पण वर्ध्यात तयार होणाऱ्या या इमारतीच्या आत असलेल्या फर्निचरचा दर्जा मात्र कोण ठरविणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदाराने डी एस फर्निचर या कंपनीकडून फर्निचर घेत जिल्हाधिकारी कार्यालयात बसविण्याची खटाटोप केली आहे. पण याआधी नगर परिषद वर्धा या कार्यालयात देखील असेच फर्निचर बसविण्यात आले, त्यात घोळ झाल्याच्या वावड्या देखील उठल्या. आता त्याच फर्निचरची दयनीय अवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी या कंपनीचे नगर परिषद मधील फर्निचर तुटले आहे. अल्पावधीतच तुटलेल्या फर्निचरमुळे वर्धा नगर परिषदेच्या आवारात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुन्हा त्याच कंपनीचे फर्निचर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लागते आहे.