वर्ध्यातील राणी दुर्गावती नगरात वृद्धाची हत्या

0

वर्धा / प्रतिनिधी :

शहरातील राणी दुर्गावतीनगरात किरकोळ वादातून ६५ वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.दगडाने ठेचल्याने गंभीर जखमी झालेल्या यादव तुकाराम कोडापे रा.दुर्गावतीनगर,यांचा सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला.शहर पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपी कमलेश दीपक कुडमेते (वय २५) रा.राणी दुर्गावतीनगर, याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी दुर्गावतीनगरातील हनुमान मंदिराजवळ यादव तुकाराम कोडापे हा जोरजोराने बोलत असताना तेथे कमलेश कुडमेते गेला तसेच तू मला शिवीगाळ का करतो,असे विचारले.यातून त्यांच्यात वाद झाला.यानंतर कमलेश कुडमेते याने यादव कोडापे याच्या डोक्यावर दगडाने मारून जखमी केले. जखमी झालेल्या यादव कोडापे याला तातडीने सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलिसांनी खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी कमलेश कुडमेते याला अटक केली.ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धोंगडे तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!