वर्ध्यातील स्वयंघोषित तीन सर्पमित्रांना अटक
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
सापाला रेस्क्यू करण्याच्या नावावर सापांसोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या आधारे वर्धेचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी नाचणगाव येथील तीन स्वयंघोषित सर्पमित्रांना रविवार 2 रोजी अटक केली. याप्रकरणी तिघांनीही गुन्हा कबुल केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली. दरम्यान, तिघांनाही न्यायालयात हजर केले असता रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरूच होती. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांच्या , उमेश शिरपूरकर मार्गदर्शनात वनरक्षक राठोड, कोठीवान, सुनील हांडे यांनी केली.