वर्ध्यात आणखी एका तरुण शेतकऱ्याने कवटाळले मुत्युला

0

प्रतिनिधी/ वर्धा:

समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
विष्णू उर्फ वैभव विठ्ठल घुमडे वय ३४ असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.विष्णु घुमडे यांचेकडे दोन एकर शेती आहे. सोबतच घरी छोटेखानी दुकानही होते. स्टेट बँकेचे कृषी कर्ज त्याने घेतले होते. सततची नापीकीमुळे कुटंबाचा भार सांभाळताना अडचण चालली होती. ह्याच विवंचनेत शनिवारी विष्णू पहाटे उठला. काही वेळ घरासमोर फिरला व घरी येत स्नानगृहासमोरील स्लॅबला गळफास घेत आत्महत्या केली. पहाटे पाच वाजताच्या दरम्यान त्याची आई झोपेतून उठली असता त्याचा मृतदेह आढळला.
पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!