वर्ध्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /वर्धा:
मानसिक रुग्णाचा उष्माघाताने मृ्त्यू झाला. ही घटना आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वर्धपूर येथे घडली. बंडू उत्तमराव वानखडे (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी विवेक वानखडे (वय ३०) याने दिलेल्या तक्रारी वरून आष्टी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार बंडूचे लग्न न झाल्याने मानसिक आघात झाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. कुणाकडेही जेवणाची मागणी करून पोट भरायचा. नेहमी आजारी राहत असल्याने शरिर अशक्त झाले होते. दरम्यान गावातील आजनकर यांच्या शेताती गोठ्याजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आला उष्माघाताने त्याचा मृ्त्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
………….