वर्ध्यात जादूटोण्याच्या नावाखाली युवकांची हत्या
प्रतिनिधी / वर्धा :
उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करीत २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे.
अब्दुल रहीम अब्दुल मजिद (६०) अब्दुल जुनेद अब्दुल रहीम (२२)अब्दुल जमीर अब्दुल रहीम (२०) रा.सर्व विठ्ठल वॉर्ड आर्वी अशी या आरोपींची नावे आहेत. तर, गणेश तुकाराम सोनकुसरे ( ४९) रा. रविदास मंदिर जवळ बेल्पुरा अमरावती असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.
सखोल चौकशी गरजेची
आर्वी येथे घडलेल्या या घटनेची व परिसरातील बाबा , मात्रिकांची वरिष्ठ पोलिस अधिका-यां द्वारे सखोल चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे. त्यातून आनखी धक्कादायक माहीती बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाला अ.भा.अंनिस नेहमीप्रमाणे संपूर्ण मदत करेल. जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रचार व पोलिसांद्वारे कडक अंमलबजावणी करणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवणूक प्रत्येक स्तरावरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत होणे गरजेचे आहे. तेव्हाच भविष्यातील अंधश्रध्दांचे बळी आपण थांबवू शकू.
– पंकज वंजारे , महाराष्ट्र राज्य संघटक अ.भा.अंनिस- युवा शाखा तथा जादुटोणा विरोधी कायदा प्रसारक