वर्ध्यात तरुणीचे लैंगिक शोषण करणार्या नराधमास अटक
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
तरुणीचे वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण करणार्या नराधमास रामनगर पोलिसांनी अटक केली. शुभम आखतकर (23) रा. गिरोली ता. देवळी असे या नराधमाचे नाव आहे.
पवनार येथील तरुणी ही सध्या शास्त्री वार्ड हिंगणघाट येथे वास्तव्यास आहे. ती घरकाम करीत असून तिचे भाऊजी वर्धा येथील जेलमध्ये असल्याने त्यांना सामान देण्याकरिता गेली होती. यादरम्यान तिची ओळख ट्रॅक्टर चालक असलेल्या शुभम आखतकर याच्याशी झाली. त्यामुळे शुभमने तिला मोबाईल क्रमांक मागितला. त्यानंतर तो तरुणीला कोणत्या ना कोणत्या कारणाने फोन करून बोलत असे. दरम्यान, 20 जुलै 2022 रोजी शुभमने फोन करून वर्धा येथे तो राहत असलेल्या सिंधी मेघे येथील किरायाच्या घरी बोलावले व बळजबरी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 21 जुलै रोजी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर शुभम हा हिंगणघाट येथे राहायला गेला. तिथे त्याने दोन ते तीन वेळा नंदोरी मार्गावरील शेतात 20 सप्टेंबर रोजी तसेच दत्त मंदिरजवळ असलेल्या खोलीवर बळजबरीने अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून तरुणीने रविवार 9 रोजी रामनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुभम आखतकर याला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप करीत आहे.