वर्ध्यात नदीत कोसळला मालवाहू मिनी ट्रक; एक मृत्यू तर दोन गंभीर आणि सात किरकोळ जखमी 

0

प्रमोद पाणबुडे/वर्धा:
सतीच अवचट / पवनार:

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बाभूळगाव येथे टायर फुटल्याने मिनी मालवाहू ट्रक वाघाडा नदीत कोसळल्याने त्यात सवार असलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला , तर दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे . तर इतर सात जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती सेलूचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे .
मिनी मालवाहू ट्रक मध्ये 13 जण सवार होते ते वाकी येथुन लग्न कार्यक्रम आटपून परत येत असताना सेलू तालुक्यांतील सुरगाव जवळील बाभुळगाव कोंगा येथील वाघाडा नदीत मालवाहू मिनी ट्रक पलटी झाली.तात्काळ गावकऱ्यांनी नदीत उडी घेत नदीत पडल्याना बाहेर काढले. नदीवरील पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली.अपघाताची माहिती सेलू पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी असून सात जण किरकोळ जखमी झाले आहे. यात 2 चिमुकल्यांचा समावेश आहे, तर दोन गंभीर असलेल्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता पोलिसांनी पाठविले आहे.
अपघातात सर्व जखमी हे देवळी तालुक्यातील पिंपळगाव या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुढील तपास सेलु पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!