वर्ध्यात महिलेवर अँसिड हल्ला

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्यात महिलेवर टॉयलेट धुण्याच्या अँसिडन हल्ला केला.. शहरातील महावीर गार्डन परिसरात ही घटना घडली.. या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.. एकतर्फी प्रेमातून ही हल्ल्याची घटना घडल्याचं पोलीसांनी सांगितलं..
वर्ध्यातील महावीर गार्डन परिसरात असताना सुरक्षा रक्षक असलेल्या व्यक्तीनं महिलेच्या अंगावर टॉयलेट धुण्याच अँसिड फेकल्यची घटना पुढं आली.. गुरुवारी ही घटना घडली.. पाठीच्या बाजूनं पडलेल्या अँसिडमुळ महिला जखमी झाली.. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठल.. पोलीसांनी आरोपीला अटक केली..
घटनेबाबत महिती देताना पोलीसांनी सांगितलं की, एकतर्फी प्रेमातून ५० वर्षीय व्यक्तीनं ४२ वर्षीय महीलेवर टॉयलेट धुण्याच अँसिड फेकल्याचा प्रकार घडला आहे.. त्यात महिलेला पाठीच्या बाजूला मानेवर जखमा झाल्या.. पोलीस लगेच तिथं पोचले.. वैद्यकीय मदत तातडीनं उपलब्ध करण्यात आली.. महिलेला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. घटना गंभीर असली तरी सुदैवाने गंभीर जखम झाली नाही.. आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!