वर्ध्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून ; ‘मरे’ ची वाहतूक विस्कळित

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्धा जिल्ह्यात दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रुळावरून क गीट्टी घसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे विभागाने DOWN मार्गावरील रात्री नऊ वाजल्यापासून गाड्या थांबवल्या आहे. 12722 दक्षिण एक्सप्रेस ही चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे तर 03253 पटना सिकंदराबाद ही एक्सप्रेस वर्धा जिल्ह्यातील वाघोली रेल्वे स्थानकावर थांबून ठेवल्याची माहिती व रेल्वे प्रशासनाने दिली आहे.तर रेल्वेची UP मार्ग सुरू आहे.