वर्ध्यात रेल्वे पोलिस व प्रवाशांच्या मदतीने अपहरण केलेल्या मुलींची सुटका
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी / वर्धा:
वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाशी रेल्वे थांबताच एका प्रवाशाने रेल्वे पोलिसाला एका मुलीचे अपहरण करून नेत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलिसानी वेळ न गमावता रेल्वेत जाऊन मुलीला ताब्यात घेतले.व दोन आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
पूर्णिया येथील 16 वर्षीय मुलीला मोहम्मद इमामूल आणि गुड्डू होना दोन्ही रा. गुदरी मोहल्ला वॉर्ड 14 फारबिसगंज अररिया बिहार या दोघांनी अल्पवयीन मुलीला पूर्णिया येथून पळवून संघमित्रा एक्सप्रेसमधून घेऊन जात होते. रेल्वे सेवाग्राम स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वर थांबली असता याची माहिती रेल्वे पोलिस दलातील उपनिरीक्षक ए. के. शर्मा यांना एका प्रवाशाने दिली. त्यांनी पोलिस स्टाप सोबत घेत तत्काळ एस 3 कोचमध्ये जात अल्पवयीन मुलीची आणि दोन युवकांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले असता त्या दोघांनी मुलीला पळवून नेत असल्याचे सांगितले.पुढील तपास बिहार पोलिस करीत आहे.